*वित्त व नियोजन विभागाच्या सुधारित मान्यतेनंतर बंधाऱ्यांचे काम होणार सुरु*
अमळनेर प्रतिनिधी- पारोळा तालुक्यातील भिलाली येथील बंधाऱ्यांच्या सुधारित मान्यतेसाठी आ शिरीष चौधरी यांनी शासन दरबारी जोमाने पाठपुरावा करून मान्यतेचा प्रस्ताव वित्त व नियोजन विभागाकडे रवाना केल्याने ग्रामस्थांचे समाधान होऊन काल आमदार चौधरी प्रत्यक्ष उपोषण स्थळी जाऊन ग्रामस्थांचे उपोषण सोडले.
भिलाली येथील सुरू असलेले कोल्हापूर टाईप बधांऱ्यांचे काम काही निधीच्या सुधारित मान्यते अभावी बंद झाले म्हणुन गेल्या चार दिवसापासुन भिलाली ग्रामस्थांनी उपोषण सुरू केले होते.सदर बधांरा पुर्णात्वास नेण्यासाठी येणाऱ्या अडचणी आमदार चौधरी यांनी शासन दरबारी पाठपुरावा करून मार्गी लावल्या. यासंदर्भात वित्त व नियोजन विभागाकडे प्रस्ताव सादर झाल्याचे पत्रच त्यांनी भिलाली ग्रामस्थांना देऊन मंजुरीनंतर काही दिवसातच काम पुर्ण करण्याचे वचन समस्त उपोषणकर्ते व ग्रामस्थांना दिले यामुळे ग्रामस्थानी विश्वास दाखविल्याने आमदार चौधरी याच्यां हस्ते निबुंपाणी देऊन उपोषण सोडण्यात आले.
यावेळी उपोषणकर्ते सरपंच गोकुळ पवार,उपसरपंच दीपक पाटील,शिवाजी पाटील ग्रामपंचायत सदस्य, नंदलाल पाटील, शरद पाटील, दत्तू पाटील, सतीश पाटील, विश्वास पाटील, गोरख पाटील, अस्तिक पाटील यांनी आमदारांचे विशेष आभार व्यक्त केले.याप्रसंगी आमदार शिरीष चौधरी, राजेंद्र नदंनवार कार्यकारी अभियंता लघु सिंचन, हेमंत राणे उपअभियंता लघु सिंचन, आर वि शिरसाठ शाखा अभियंता, किरण गोसावी, नगरसेवक भाऊसाहेब महाजन, सुनील भामरे, अनिल महाजन, योगेश पाटील, हेमंत चौधरी, निंबा पाटील, हेमंत पाटील, मगन पाटील, व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
फोटो
भिलाली ता.पारोळा येथील उपोषण सोडवतांना आ.शिरीष चौधरी ,पदाधिकारी व शेतकरी बांधव
छाया ईश्वर महाजन