शिक्षक उमेदवारांच्या भाऊगर्दीमुळे प्रतिष्टेची होणार.
अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन)-भारत निवडणूक आयोगाने दिनांक २४ मे २०१८ रोजी महाराष्ट्र विधान परीषदेच्या नाशिक विभाग शिक्षक मतदार संघाच्या निवडणुकीची घोषणा केली.जळगांव, धुळे, नंदुरबार, नगर, नाशिक जिल्हयासह आदर्श आचारसंहिता लागू केली आहे.अशी माहीती जिल्हाधिकारी तथा सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी किशोरराजे निंबाळकर यांनी एका प्रसिद्धी पत्राद्वारे कळविले आहे.
निवडणुकीचा कार्यक्रम खालील प्रमाणे अधिसुचना प्रसिद्धी ३१ मे २०१८,रोजी नामनिर्देशन पत्र दाखल करण्याचा शेवटचा दिनांक ७ जुन,नामनिर्देशन पत्राची छाननी ८ जुन रोजी उमेदवारांनी नामनिर्देशन माघार घेण्याचा दिनांक शेवटी ११जुन,मतदान दिनांक २५ जुन रोजी सकाळी ८ ते ४ वाजेपर्यंत, मतमोजणी दिनांक २८ जुन २१८ रोजी होणार आहे.तरी सर्व शिक्षक मतदार, राजकीय पक्ष,संभाव्य उमेदवार व संबधीत शासकीय विभाग यांनी नोंद घ्यावी असे जिल्हाधिकारी किशोरराजे निंबाळकर यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे.
शिक्षक आमदारकीसाठी डझनभर उमेदवार उभे आहेत
सध्या शिक्षक आमदारकीच्या निवडणुकीत अनेकांची भाऊगर्दी असली तरी शिक्षक उमेदवार म्हणून विलास शांताराम पाटील हे ओबीसी शिक्षक असोसिएशनचे प्रदेशाध्यक्ष व माध्यमिक शिक्षक असून गेल्या पंचवीस वर्षांपासून अध्यापनाचे काम करीत आहेत.त्यानंतर शालीग्राम भिरूड हे माध्यमिक शिक्षक पतपेढीचे अध्यक्ष व कला शिक्षक आहेत व यांनी शिक्षकांचे प्रश्न सोडले असून या दोन्ही उमेदवार शिक्षक असल्याने त्यांचा विचार शिक्षक बांधवानी शिक्षकच उमेदवाराला पसंती दिली तर शिक्षकच आमदार होऊ शकतो.परंतु अर्थीक व जातीपातीचे राजकारण झाले तर बिगर शिक्षक आमदार होऊन निवडून येऊ शकतो अशी चर्चा शिक्षकामध्ये सुरू आहे.वास्तविक पहाता शिक्षक आमदारकीच्या निवडणुकीत शिक्षकाला पसंती दिली पाहिजे, गेल्या काही वर्षापासून आर्थीक उलाढाल होऊन संघटनेत काम करणारे, शिक्षक वंचीत होऊन दुसराच उमेदवार निवडणुकीत निवडणून येत आहे.ज्याचा शिक्षक पेशाशी काडीमात्र संबध नाही, शिक्षकाचे पश्न माहिती नाही, संघटनेत काम नाही अशा उमेदवाराला जर शिक्षकांनी निवडणून दिले तर शिक्षकांचे पश्न सोडविणारे,व संघटनेत प्रामाणिकपणे काम करण्यांचे काय? याचे शिक्षक मतदार बंधू व भगीनीनी आत्मपरीक्षण करण्याची वेळ आहे.म्हणून शिक्षक असलेल्या मेदवारालाच पसंती दिली जाईल अशी चर्चा शिक्षकामध्ये सध्या सुरू आहे.