धावपळीच्या युगात आम्ही एकत्र आल्याचा आनंद-सुनील भामरे
अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन)-आज प्रत्येकांशी धावपडीच्या जगात प्रत्येकांशी संपर्क करणे दुरापास्त झाले आहे.परंतू या गोष्टीला छेद देत अमळनेर शहरात मित्रपरीवारांचा व्हाट्सएपचा गृप असावा.जेणेकरून सुख दुखात सहभागी होता येईल .शहरासाठी काही नवीन उपक्रम राबवता येतील म्हणून शहरातील युवा सामाजिक कार्यकर्ते व महाराष्ट्र नवनिर्माण संघटनेचे माजी जिल्हाध्यक्ष सुनील भामरे व मित्र परीवाराने व्हाँटसफचा* *माझं गावं,माझं अमळनेर*
या गृपची स्थापना केली.
या गृपच्या माध्यमातून अनेक शहरातील समविचारी तरुण एकत्र आल्याने अनेक सामाजिक बांधीलकी जोपासत अनेक कार्यक्रमाचे आयोजन केले.वृक्षारोपण, जेष्ट नागरिक सन्मान सोहळा,स्पर्धा, श्रमदान शिबीरात सहभाग ,गोरगरीब मुलांना वह्या व दप्तर वाटप,भोजन,स्नेहभोजन मेळावा, अशी विविध कार्यक्रमाचे आयोजन
या गृपच्या सभासदांनी केला आहे.
माझं गांव,माझं अमळनेर या गृपचे सामाजिक क्षेत्रातील कामाबाबत नुकतेच जवखेडा येथे श्रमदानासाठी जिल्हाधिकारी किशोरराजे निंबाळकर आले असता
त्यांनी सुध्दा गृपबद्दल गौरव उदगार काढले माझं गावं माझं अमळनेर या गृपच्या माध्यमातून सर्व समविचारी तरूण एकत्र आल्यामुळे शहराच्या विकासासाठी आपण करीत असलेले कार्य कौतुकास्पद आहे.असेच काम करीत राहिल्यास आपली प्रेरणा इतर घेतील असे सांगितले.
.पुढे भविष्यात या गृपच्या माध्यमातून सामाजिक, शैक्षणिक सांस्कृतिक क्षेत्रांत वेगवेगळे उपक्रम राबविले जाण्याचा मानस गृपचे अध्यक्ष सुनील भामरे यांनी दैनिक साईमतशी बोलतांना सागितले.