अमळनेर प्रतिनिधी- अमळनेर
शहरात पिण्याच्या पाण्याचा प्रश्न उद्भवू नये यासाठी दुरदुष्टी ठेवून शहरात १२६ कुपनलिका नादुरुस्त पडलेल्या होत्या.मागच्या वेळेस माजी आमदारांनी प्रत्येक काँलनीमध्ये बोअर केले होते. काही चालू आहेत तर काही बंद अवस्थेत आहेत.प्रभाग क्रमांक चौदामधील नगरसेविका कमलबाई पिंताबर पाटील व युवा सामाजिक कार्यकर्ते रविंद्र पिंताबर पाटील यांनी प्रभाग चौदामधील बावीस वर्षापुर्वीचा बंद पडलेली कुपनलीका सुरू करावी सदर काँलनीतील पाण्याचा प्रश्न सुटू शकतो याबाबत पाठपुरावा माजी आमदार साहेबराव पाटील, व लोकनियुक्त नगराध्यक्षा पुष्पलता पाटील यांच्याकडे केला.सदर प्रकरणाला माजी आमदरांनी लागलीच काम करण्याचे सागितले युद्धपातळीवर काम करून बावीस वर्षांपासून बंद पडलेली कुपनलीका सुरू झाली.
प्रभाग क्र.14 मध्ये सन 1996 ( 22 वर्षा ) पासुन बंद अवस्थेत असलेल्या कूपनलीकेत नवीन विद्युत पंप (मोटार) बसवून त्याचे लोकार्पण." करण्यात आले
अमळनेर शहरातील नागरिकांसाठी पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण होऊ नये यासाठी दुरदुष्टी ठेऊन टंचाईवर यशस्वी मात करण्यासाठी अमळनेर शहरातील 126 कूपनलीका दुरुस्तीचे काम युध्द पातळीवर अमळनेर नगरपरिषदेने हाती घेतले असुन प्रभाग क्र.14 मधे *विद्या विहार कॉलनीत सन 1996 ( 22 वर्षा ) पासुन कूपनलीका (हँन्डपंप) बंद अवस्थेत होता.त्या जागी नवीन विद्युत पंप बसवून त्याचे लोकार्पण करतांना मा.आ.कृषिभूषण साहेबराव पाटील, सोबत रवि पाटील, विक्रांत पाटील मा.नगरसेवक, साखरलाल सर नगरसेवक, राजू महाजन , साहेबराव साळुंखे, जगताप सर,एस.जी.पाटील सर, कल्पेश साळुंखे, दगडू सोनार, शिवाजी पाटील राहुल शिंपी, अमोल पाटील, सचिन सोनवणे, प्रविण वाघ, शिगांणे सर इ. परिसरातील नागरिक. उपस्थित होते.प्रभाग चौदामधील नागरीकांनी माजी आमदार साहेबराव पाटील, लोकनियुक्त नगराध्यक्षा पुष्पलता पाटील, नगरसेविका कमलबाई पाटील, युवा कार्यकर्ते रविद्र पिंताबर पाटील यांचे आभार मानले