*आ चौधरींच्या प्रयत्नाने प्रस्ताव मंजुरीसाठी सादर*
अमळनेर( )पारोळा तालुक्यातील भिलाली येथील कोल्हापूर टाईप बंधाऱ्यांच्या सुधारित प्रशासकीय मान्यतेचा प्रस्ताव वित्त व नियोजन तसेच व्यय व अग्रक्रम विभागाकडे मंजुरीसाठी सादर झाला असून या विभागाच्या येत्या बैठकीत या प्रस्तावास मंजुरी मिळून हा प्रश्न कायमचा सुटेल अशी माहिती आ शिरीष चौधरी यांनी देत,भिलाली येथील ग्रामस्थांनी उपोषण मागे घ्यावे अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.
बंधाऱ्याचे काम निधी अभावी अपूर्ण असून वाढीव कामांसाठी सुधारित प्रशासकीय मान्यता 10 कोटी 79 लाख 88 हजार निधीचा प्रस्ताव शासन दरबारी काही महिन्यापासून धूळ खात पडलेला होता,काम बंद पडल्याने ग्रामस्थांनी उपोषण करण्याचा पावित्रा घेतला. या विषयाचे गार्भीय आमदार शिरीषदादा चौधरी यांनी लक्षात घेऊन दिनांक 23 रोजी दुपारी जलसंधारण विभागाचे सचिव व उपसचिव यांची मंत्रालयात प्रत्यक्ष भेट घेऊन बंधाऱ्यांस सुधारीत प्रशासकीय मान्यता मिळावी अशि मागणी केली.यामुळे सदरचा प्रस्ताव नियोजन व वित्त विभागाकडे मान्यतेसाठी सादर करण्यात येत असून पुढील आठवड्यात होणाऱ्या बैठकीत यास मिळवून घेऊन पुन्हा जलद गतीने कामास सुरुवात होईल असा विश्वास आ चौधरी यांनी व्यक्त केला.