*प्रत्येक कुटुंबाने महिलांना उद्योगासाठी प्रोत्साहन द्यावे-सौ अनिता चौधरी*
अमळनेर( ) महाराष्ट्र जर्नालिस्ट फाऊडेंशनच्या वतीने दिला जाणारा दी प्राईड ऑफ इंडिया भास्कर अवार्ड 2018 महीला रत्न पुरस्कार यंदा सौ अनिता शिरीष चौधरी यानां जाहीर झाला असून या पुरस्काराचे वितरण पणजी (गोवा) येथील दिनानाथ मंगेशकर कला अकादमी येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे जेष्ठ बंधू आणि गुजराथ मधील सर्वोदय फाऊंडेशन चे अध्यक्ष सोमाभाई मोदी यांच्या हस्ते करण्यात आले.
पुरस्कार वितरण प्रसंगी गोवाचे मा.मुख्यमंत्री प्रतापसिंह राणे, महाराष्ट्र जर्नालिस्ट फाऊंडेशन चे संस्थापक अध्यक्ष डॉ राजीव लोहार, महिला विभाग अध्यक्षा सौ मनीषा लोहार, अमळनेरचे आमदार शिरीष चौधरी,गोव्याचे खासदार विनय तेंडोलकर,माजी मंत्री रमाकांत खलप, वाडिया हॉस्पिटलचे बोधनवाला, अभिनेत्री नेहा सक्सेना, अनिरबन सुकुल,प्रदेश अध्यक्ष भा.ज.पा ओबीसी मोर्चा विजय चौधरी, कामगार नेते अजितसिंह राणे, प्रशांत लंगरे, सागर कहाणे, आदिंसह मान्यवर उपस्थित होते, विविध क्षेत्रात कार्याचा ठसा उंमटविणाऱ्या 50 जणांना हा पुरस्कार तर 13 जणांना सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले.नंदुरबार येथील माजी नगरसेविका तथा सामाजिक कार्यकर्त्या सौ अनिता चौधरी यांनी महिलांसाठी उल्लेखनीय कार्य केले असून त्यांना चॉकलेट, मेणबत्ती, बिस्कीट , कापडी पिशवी यासह इतर व्यावसायिक प्रशिक्षण देऊन स्वतःचा उद्योग उभा करण्यासाठी मार्गदर्शन व सहकार्य त्या करीत असतात आतापर्यंत अनेक महिलांना त्यांनी स्वावलंबी बनवून स्वतःच्या पायावर उभे केले आहे.त्याच अनुषंगाने सौ चौधरी यांची महिला रत्न पुरस्कारासाठी निवड होऊन मोठ्या सन्मानाने त्यांना हा पुरस्कार बहाल करण्यात आला.
पुरस्कार वितरण प्रसंगी आपल्या भावना व्यक्त करताना त्या म्हणाल्या की या पुरस्कारामुळे आम्हाला निश्चितच आणखी प्रेरणा मिळणार असून जास्तीत जास्त महिला भगिनी उद्योगातून स्वावलंबी व्हाव्यात हाच आमचा प्रयत्न आहे.प्रत्येक घरातून महिलांना उद्योगासाठी प्रोत्साहन मिळाल्यास या देशातील प्रत्येक कुटुंब खऱ्या अर्थाने सक्षम झाल्याशिवाय राहणार नाही असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.सदर पुरस्काराबद्दल त्यांचे नंदुरबार येथील उद्योजक हिरालाल चौधरी,हिरा उद्योग समूहाचे चेअरमन डॉ रविंद्र चौधरी,आ शिरीष चौधरी आदींसह अमळनेर व नंदुरबार मतदार संघातील जनतेने त्यांचे अभिनंदन केले आहे.