अखेर विदयाविहार काँलनीत माजी आमदार साहेबराव पाटील यांच्यामुळे मिळाला विजेचा पोल.
माजी आमदार, साहेबराव पाटील व रविंद्र पाटील यांचा रहीवाशांनी केला सत्कार.
अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन)अमळनेर शहरात नगरपालीकेची सत्ता माजी आमदार कृषीभूषण साहेबराव पाटील व लोकनियुक्त नगराध्यक्षा पुष्पलता पाटील, व नगरसेवक यांनी कामाचा धडाका लावला आहे.रस्ते, विज,पाणी,स्वच्छता, ओपन प्रेसमध्ये बगीचा, थोरपुरूषांचे नाव व पुतळा मुख्य रस्त्यावर बसवून शहराच्या सौदर्यात वाढ झाली आहे.
विदयाविहार काँलनी मधील गट नंबर १४३० मध्ये विजेचा पोल नसल्याने सर्वत्र परीसरात अंधार असायचा.पावसाळ्यात विषारी किटक घरात घुसायची या बाबत बरयाच वेळा नगरपालिकाकडे तक्रार करूनही लक्ष देत नव्हते. पण स्थानिक प्रभाग चौदामधील नगरसेविका श्रीमती कमलबाई पाटील व युवा कार्यकर्ते रविंद्र पाटील यांनी हा प्रश्न माजीआमदार साहेबराव पाटील यांना सागितल्यानंतर त्यांनी क्षणाचा विचार न करता प्रश्न मार्गी लावण्यास सांगितला.युवा कार्यकर्ते रविंद्र पाटील यांनी ऐन दिपावलीतच विजेचा पोल टाकून लाईट सुरू करून दिला.त्याबद्दल स्थानिक रहिवासी ईश्वर महाजन ,प्रविण पाटील, जे.पी.पवार, मिंलीद संदानशिव, विकास शेलकर,प्रविण गोसावी यांनी माजी आमदार कृषीभूषण साहेबराव पाटील, व रविंद्र पिंताबर पाटील, यांचा शाल बुके देऊन सत्कार केला.
सत्काराला उत्तर देतांना माजी आमदार कृषीभूषण साहेबराव पाटील म्हणाले कि सध्या अमळनेर शहराच्या विकासासाठी आम्ही सदैव कटिबद्ध राहू. गटनंबर १४३० मधील ररत्यांचे काम लवकरच केले जाईल. आपल्या कोणत्याही समस्या असो त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही निवडणूक आले आहोत. अमळनेर तालुक्याच्या विकासासाठी सदैव कटिबद्ध राहू.आपण आमचा सत्कार केला आम्ही आपल्या ऋणात राहू असे सांगितले. प्रभाग चौदामध्ये कोणकोणती कामे झाली याबाबत रविंद्र पाटील यांनी सांगितले कि.लोकनियुक्त नगराध्यक्षा पुष्पलता पाटील, व माजी आमदार यांच्या मार्गदर्शनाखाली काम करतांना समाधान मिळत आहे. व प्रभाग चौदामधील रहिवासी समाधानी आहेत. असे सांगितले.
यावेळी बांधकाम सभापती मनोज पाटील, एल बी पाटील, कपील पाटील, रोशन पाटील, महेश पाटील,अशोक साळुंखे, जयवंत पाटील, सफी मास्तर, गोकुळ पाटील, अक्षय चव्हाण, अमोल पाटील, शरद गुजर,उपस्थित होते.यावेळी उपस्थित मान्यवरांचा सत्कार जे.पी.पवार, प्रविण पाटील, ईश्वर महाजन यांनी केला.सुत्रसंचालन ईश्वर महाजन यांनी केले तर आभार जे.पी पवार यांनी मानले.