Halloween party ideas 2015


प्रा भरत पाटील यांना आदर्श शिक्षक पुरस्कार

मित्रपरीवारांकडून अभिनंदनाचा वर्षाव.

हि तर चांगल्या कामाची पावती-पुरस्कारथीँँ-प्रा.भरत पाटील.

 अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन)

धुळे तालुक्यातील कुसुंबा येथील एम के शिंदे कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राध्यापक भरत वसंतराव पाटील यांना डॉ पंजाबराव देशमुख राष्ट्रीय शिक्षक परिषदेतर्फे देण्यात येणारा महात्मा ज्योतिराव फुले आदर्श शिक्षक पुरस्काराने नुकतेच जालना येथे गौरविण्यात आले.

  प्रा.भरत पाटील यांनी शैक्षणीक सामाजिक क्षेत्रातील गेल्या काही वर्षापासून कार्य करतांना विद्यार्थी केंद्रबिंदू मानून अध्यापन व नाविन्यपूर्ण उपक्रम राबवीत आहे.त्यांच्या कार्याची दखल महात्मा फुले पंजाबराव देशमुख  राष्ट्रीय शिक्षक परीषदेने घेतला .

जालना येथील डॉ बाबासाहेब आंबेडकर सभागृहात डॉ पंजाबराव देशमुख राष्ट्रीय शिक्षक परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष पप्पू पाटील भोयर यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला यावेळी जालना पोलीस अधीक्षक एस चैतन्य, कार्याध्यक्ष अंबादास रेडे, संजय लाखे पाटील, जालना उपनगराध्यक्ष राजेश राऊत यांच्यासह मान्यवरांची उपस्थितीत करण्यात आला. प्रा पाटील यांचे कुसुंबा एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष रावसाहेब शिंदे, उपजिल्हाधिकारी संदीप पाटील, प्राचार्य के डी पाटील, माजी प्राचार्य टी पी शिंदे,शालीक बोरसे, रविंद्र बोरसे, चेतन शिंदे, प्रशांत साळुंखे, प्रा दिपक पाटील, शांतीलाल पाटील (अमळनेर) व प्राध्यापक, शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले आहे. प्रा पाटील हे अमळनेर येथील दिव्यमराठी प्रतिनिधी चंद्रकांत पाटील यांचे शालक आहेत त्यांनी व अमळनेर तालुका व शहर पत्रकार संघाचे तालुकाध्यक्ष चेतन राजपुत,सचीव चंद्रकांत पाटील व पत्रकार बांधवानी अभिनंदन करून भावीवाटचालीस शुभेच्छा दिल्या.

फोटो

उपक्रमशील प्रा.भरत पाटील यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जालना येथे  स्मृतिचिन्ह व सन्मानपत्र देतांना

महात्मा फुले पंजाबराव देशमुख परीषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष पप्पू भोयर,पोलीसअधिक्षक एस.चैतन्य, कार्याध्यक्ष अंबादास रेडे व मान्यवर

छाया ईश्वर महाजन अमळनेर

WhatsApp वर क्लिक करा बातमी मिळवा

लोकप्रिय बातम्या

महत्वाच्या घडामोडी

Powered by Blogger.