वृक्षप्रेमीमध्ये नाराजी
अमळनेर प्रतिनिधी
अमळनेर चे उत्कृष्ट अंबरीषी टेकडी वरील वृक्षवन....पुन्हा जाळण्यात आले* गेल्या पंधरा दिवसात हा तिसरा प्रकार आहे कुणी तरी विघ्नसंतोषी लोक आहेत . टेकडी वरील वनराईचं नुकसान होत आहे.झाडे लावण्यासाठी व जगवण्यासाठी टेकडी वर नियमीत जाणारे यांच्या गेल्या अनेक वर्षापासून श्रमदानातुन हि सुदंर वनराई तयार झाली आहे.प्रत्येक झाडापर्यत पाणी पोहचवण्यासाठी नियमीत सकाळी टेकडी गृप प्रयत्न करीत असतो. आज सर्व अमळनेर वासीयांना ऑक्सिझन झोन तयार झाला आहे.परंतु असे प्रकार सातत्याने होत असल्याने खुप मोठे नुकसान होत आहे .अश्या विघ्नसंतोषी लोकांचा बंदोबस्त नाही झाला तर उद्या सपुंर्ण वनराईचं मोठे नुकसान होईल .(या घटनेचा जाहीर निषेध आहे .त्वरीत या ठिकाणी सी सी टि व्ही कॅमेरे लावण्यात यावे व दोषी कोण असतील त्यांच्या तपास लावणे अत्यंत गरजेचे आहे . मा.पोलीस निरीक्षक श्री अंबादास जी मोरे यांच्या आदेशाने तात्काळ नगरपालिका अग्निशमन विभागाचा वाहनाने परिसरातील काही आग शांत करण्यात आली अग्निशमन विभागास संपर्क केल्या बरोबर तात्काळ गाडी आल्याने होणारा अनर्थ आटोक्यात आला. नपा प्रशासनाचे आभार वृक्ष प्रेमींनी मानले आहे.
फोटो