*नुतन नगरपरिषद इमारतीस क्रांतीसुर्य महात्मा फुले यांचे नाव द्यावे----प्रवीण महाजन*
*महात्मा फुले विचार मंच व विविध संघटनांची मागणी*
अमळनेर(प्रतिनिधी) क्रांतिसूर्य बहुजन नायक छत्रपती शिवाजी महाराज यांची समाधी शोधून प्रथम शिव जयंती साजरी करणारे शिव जयंतीचे जनक भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे गुरू महात्मा जोतीराव फुले व सावित्रीबाई फुले यांचे शैक्षणिक सामाजिक क्रांती पाहता ते सर्व बहुजनांचे क्रांतिसूर्य आहेत अमळनेर नूतन न.पा.इमारतीस क्रांतिसूर्य महात्मा जोतिबा फुले इमारत असे नामकरण करण्यात यावे व भव्य स्मारक(सुची-शिल्प)निर्माण करावे असे प्रतिपादन क्रांतीसुर्य महात्मा फुले विचार मंच चे संस्थापक व महाराष्ट्र माळी समाज महासंघाचे प्रदेश संघटक प्रवीण बी.महाजन यांनी केले ते सावित्रीबाई फुले जयंती सप्ताह निमित्त क्रांतीसुर्य महात्मा फुले विचार मंच व विविध सामाजिक संघटना तर्फे माजी आमदार साहेबराव पाटील,नगराध्यक्षा पुष्पलता साहेबराव पाटील यांना मागणी निवेदन देतेवेळी राजभवन येथे बोलत होते. या मागणीला विविध सामाजिक संघटनांनी पाठिंबा दिला आहे.
यावेळी प्रवीण महाजन,उपनगराध्यक्ष बिरजू लांबोळे, नगरसेविका रत्नमाला साखरलाल माळी, नगरसेवक सुरेश सोनवणे,उदय खैरनार,आर.एस.माळी, नगरसेविका रत्नाबाई प्रकाश महाजन,महेश माळी, साहित्यिक गोकुळ बागुल,बाबू साळुंखे हर्षल महाजन,नगरसेवक रामकृष्ण पाटील,संजय महाजन,मनोज पाटील,विक्रांत पाटील,मुन्ना शिंपी,पप्पू महाजन यांच्या सह महात्मा फुले विचार मंच,महाराष्ट्र माळी समाज महासंघ,ओबीसी जनक्रांती परिषद,ओबीसी परिषद आदी सामाजिक संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते.यावेळी माजी आमदार साहेबराव पाटील यांनी न.पा. इमारतीस महात्मा फुले यांचे नाव देण्याचे मान्य केले आहे
फोटो