Halloween party ideas 2015

*अमळनेर ते चोपडा उड्डाण पुलास महात्मा जोतिबा फुले यांचे नाव द्या*
*महात्मा फुले विचारमंच सह सामाजिक संघटनांचे निवेदन*

अमळनेर(प्रतिनिधी) अमळनेर येथील  अमळनेर ते चोपडा उड्डाण पुलास क्रांतीसुर्य महात्मा जोतिबा फुले उड्डाण पूल असे नामकरण करून त्वरित मंजुरी द्यावी अशी मागणी क्रांतिसूर्य महात्मा फुले विचार मंच व सामाजिक संघटनांनी सावित्रीबाई फुले जयंती निमित्त केली आहे.सर्व प्रथम फुले दाम्पत्य यांच्या प्रतिमेस आमदार शिरीष चौधरी व रवींद्र चौधरी यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून माल्यार्पण करण्यात आले.
निवेदनात म्हटले आहे की महात्मा फुले यांचे सामाजिक,शैक्षणिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य पाहता ते समस्त बहुजनांचे क्रांतीसुर्य आहेत भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे गुरू असून जगातील अनेक विद्यापीठात त्यांच्या विषयी अभ्यासक्रम आहे.
यावेळी महाराष्ट्र माळी समाज महासंघाचे प्रदेश संघटक व क्रांतिसूर्य महात्मा फुले विचार मंच चे संस्थापक प्रवीण बी.महाजन,तालुकाउपाध्यक्ष मुडी येथील लोकनियुक्त सरपंच काशीनाथ माळी, देवळी येथील सरपंच व सचिव अशोक माळी, शिरूड येथील माजी सरपंच व्यापारी आघाडी तालुकाध्यक्ष बापूराव महाजन,तालुकाध्यक्ष प्रवीण माळी, नगरसेविका ज्योती धनंजय महाजन नगरसेवक सुरेश सोनवणे,धनू महाजन,अनिता महाजन,नगरसेवक देविदास महाजन,क्षत्रिय काच माळी समाजाचे अध्यक्ष गंगाराम महाजन,फुलमाळी समाजाचे अध्यक्ष दिलीप पाटील,माजी नगरसेवक बाळकृष्ण महाजन,माजी उपनगराध्यक्ष पांडुरंग माळी,दिनेश माळी,मनोहर महाजन,माजी उपनगराध्यक्ष अनिल महाजन,पातोंडा येथील माळी समाजाचे अध्यक्ष रवींद्र बोरसे,उदय खैरनार,अमोल माळी,गोपाल माळी,कैलास माळी,बाळू माळी, विजय माळी(भरवस)भालचंद्र माळी(कळमसरे)शिवाजी माळी, श्रीकृष्ण माळी, सचिन माळी(देवळी) भाऊ माळी(दहिवद)रवींद्र माळी(गांधली)वसंत चौधरी(कळमसरे)संदीप माळी(भिलाली)आदी उपस्थित होते.निवेदनावर देवळी,पातोंडा,दहिवद,गांधली, पिंपळी,जवखेडा,कळमसरे,शहापूर,जैतपीर,भरवस,लोण, भिलाली,आदी गावातील नागरिकांच्या असंख्ये स्वाक्षऱ्या आहेत
क्रांतीसुर्य महात्मा फुले विचारमंच,महाराष्ट्र माळी समाज महासंघ,महात्मा फुले समता परिषद,ओबीसी जनक्रांती परिषद,ओबीसी शिक्षक पालक असोसिएशन,संत सावता माळी सेवा संघ आदी संघटनेच्या पदाधिकारी कार्येकर्ते शाखा प्रमुख उपस्थित होते
फोटो

WhatsApp वर क्लिक करा बातमी मिळवा

लोकप्रिय बातम्या

महत्वाच्या घडामोडी

Powered by Blogger.