*जीवनगौरव व उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्काराचे आज वितरण*
*महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ ; भव्य रक्त दान शिबीर व आरोग्य तपासणी शिबीर*
अमळनेर प्रतिनिधी
*जळगाव* - महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या वतीने पत्रकारिता क्षेत्रात प्रभावी व भरीव कामगिरी केलेल्या जेष्ठ संपादक/पत्रकार यांना जीवनगौरव पुरस्कार व जिल्ह्यातील निर्भीड पत्रकारांना उत्कृष्ट पत्रकार पुरस्काराचे *आज रविवार दिनांक ६ जानेवारी २०१९ रोजी १०.३० वाजता अल्पबचत भवन,जिल्हाधिकारी कार्यालय आवार येथे आयोजित केला आहे.*
आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांचा जन्म दिवस पत्रकार दिन म्हणून संपूर्ण महाराष्ट्रभर साजरा करण्यात येत असतो.पत्रकार दिनाचे औचित्य साधून जेष्ठ पत्रकार यांना जीवन गौरव पुरस्कार व निर्भीड पत्रकारांना उत्कृष्टपत्रकारिता पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येत आहे.यावेळी *डॉ.उल्हास पाटील मेडिकल कॉलेज यांच्या सौजन्याने भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. तर जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाच्या वतीने पत्रकार व त्यांच्या परिवाराचे १२ प्रकारचे आरोग्य तपासणी मोफत केली जाणार आहे.* तरी जिल्यातील पत्रकार बांधवानी या कार्क्रमास उपस्थित राहून लाभ घ्यावा व पुरस्कार्थी पत्रकार बांधवानी परिवारसह उपस्थित राहून पुरस्कार स्वीकारावा असे आवाहन जिल्हाध्यक्ष प्रवीण सपकाळे,विभागीय अध्यक्ष किशोर रायसाकडा,जिल्हा कार्याध्यक्ष भारत काळे,महानगरध्यक्ष राजेंद्र पाटील,ग्रामीण जिल्हाध्यक्ष भूषण महाजन,महानगर कार्याध्यक्ष रितेश माळी, जिल्हा उपाध्यक्ष शैलेश पाटील,संभाजी देवरे,सुनील भोळे,जिल्हा सचिव मनोज भांडारकर यांनी केले आहे.
*महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ,जळगाव*