अमळनेरात पत्रकार भवनाच्या निर्मितीसाठी प पु संत प्रसाद महाराजांसह मान्यवरांनी केल्या दोन लाखांच्या देणग्या जाहीर
पत्रकार दिनानिमित्त आयोजित सोहळ्यात पत्रकारांचा सन्मान, एकोप्याचेही दर्शन,
अमळनेर प्रतिनिधी
अमळनेर-मराठी वृत्तपत्राचे जनक आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर जयंती निमित्त आयोजित पत्रकार दिन सोहळ्यात प.पु.संत प्रसाद महाराज यांनी नियोजित पत्रकार भवनासाठी 51 हजार देणगीची घोषणा केली,तर माजी आ.कृषिभूषण साहेबराव पाटील यांनी 1लाख 11 हजार व राष्ट्रवादीचे नेते अनिल भाईदास पाटील 51 हजार देणगी जाहीर केली,या सोहळ्यात पत्रकारांचा सन्मान होऊन पत्रकारांच्या एकोप्याचेही दर्शन घडून आले.
शहरातील जि.प.विश्राम गृहात अमळनेर शहर व तालुका पत्रकार संघाच्या वतीने हा सोहळा पार पडला.विठ्ठल रुखमाई वाडी संस्थानचे गादीपती प.पु.संत प्रसाद महाराज यांची विशेष उपस्थिती या सोहळ्यात होती,त्यांच्या शुभहस्ते आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेचे पूजन व माल्यार्पण करण्यात आले.तर महाराजांसह नगराध्यक्षा सौ पुष्पलता पाटील,माजी आ.कृषिभूषण पाटील,राष्ट्रवादीचे नेते अनिल भाईदास पाटील,जिल्हा बँक संचालिका सौ तिलोत्तमा पाटील,पत्रकार संघाचे अध्यक्ष चेतन राजपूत,सचिव चंद्रकांत पाटील यासह मान्यवरांच्या हस्ते दिपप्रज्वलन करण्यात आले.यावेळी प पु प्रसाद महाराजांनी आशीर्वादपर मनोगत व्यक्त करताना नगराध्यक्षा सौ पुष्पलता पाटील यांच्या प्रयत्नाने न प च्या माध्यमातून पत्रकार संघटनेस मंजूर झालेल्या भूखंडावर लवकरच भव्य पत्रकार भवन उभे राहील असा आशीर्वाद देऊन या स्तुत्य उपक्रमासाठी संस्थांनच्या वतीने 51 हजार रु.देणगी जाहीर केली.यानंतर कृषिभूषण पाटील यांनी 1 लाख 11 हजार व अनिल पाटील यांनी 51 हजार जाहीर करून भविष्यात अजून मदतीचा हात देण्याची तयारी दर्शविली.महाराजांनी जाहीर केलेल्या देणगीबद्दल पत्रकार संघाच्या वतीने जेष्ठ पत्रकार पंडित चौधरी,किरण पाटील, डीगंबर महाले,पांडुरंग पाटील,राजेंद्र पोतदार,संजय पाटील,चंद्रकांत काटे,आदींनी त्यांचा सत्कार केला,तर पत्रकार भवनासाठी भूखंड दिल्याबद्दल नगराध्यक्षा सौ पुष्पलता पाटील व कृषिभूषण पाटील यांचा अध्यक्ष चेतन राजपूत व सचिव चंद्रकांत पाटील यांनी सत्कार केला.आ.शिरीष चौधरी यांनी पत्रकार भवनांसाठी 10 लाख निधी मंजूर केला असून अजून वाढीव निधी देण्याची तयारी दर्शविली असल्याने त्यांचेही जाहीर आभार यावेळी संघटनेच्या वतीने व्यक्त करण्यात आले.
शहरी व ग्रामिण भागातील पत्रकार या सोहळ्यानिमित्त एकत्रित आल्याने अनेकांनी कौतुक केले. यावेळी असंख्य मान्यवरांनी भेटी देऊन अध्यक्ष,सचिव व पत्रकार बांधवाचा विशेष सन्मान केला.यात प्रामुख्याने पोलीस निरीक्षक अनिल बडगुजर,उपनगराध्यक्ष विनोद लांबोळे,न प चे बांधकाम सभापती मनोज पाटील,खा.शि.मंडळाचे संचालक हरी भिका वाणी,कल्याण पाटील,प्रदीप अग्रवाल,महिला बालकल्याण सभापती ऍड चेतना पाटील,राष्ट्रवादीच्या प्रा रंजना देशमुख,सौ दीपाली पाटील,खा शि मंडळाच्या उपाध्यक्षा सौ माधुरी पाटील,बाजार समितीचे संचालक पराग पाटील,अर्बन बँक संचालक पंकज मुंदडा,भरत ललवाणी,पाडळसरे संघर्ष समितीचे सुभाष चौधरी,प्रशांत भदाणे,सुरेश काटे,अजय पाटील,रणजित शिंदे,रणजित पाटील,प्रा सुरेश पाटील,शिवाजीराव पाटील,अमोल माळी,पंकज चौधरी,योगराज संदानशिव,गजानन गुंजाळ,सुनिल भामरे,निशांत नेरकर,योगेश येवले,शाम पुरकर,सुवर्णकार समाजाचे पिंटू भामरे,निलेश देवपूरकर यासह राजकीय व सामाजिक क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
प्रास्तविक व सूत्रसंचालन डीगंबर महाले यांनी केले.यावेळी जेष्ठ पत्रकार सुभाष पाटील,ग का सोनवणे, पत्रकार उमेश काटे, जयेश काटे, विवेक अहिरराव, सदानंद पाटील, महेंद्र रामोशे, जितेंद्र ठाकुर, मुन्ना शेख,भटेश्वर वाणी, अमोल पाटील, जितेंद्र पाटील, आबिद शेख, विजय सुतार,सुकदेव ठाकुर, सचिन चव्हाण, विनोद खैरनार, योगेश महाजन, युवराज पाटील, उमेश धनराळे,धर्मवीर पाटील,गौतम बिर्हाडे,डॉ विलास पाटील,बाबूलाल पाटील,हिरालाल पाटील,विजय गाढे,धनंजय सोनार प्रेस फोटोग्राफर महेंद्र पाटील यांच्यासह ग्रामीण भागातील पत्रकार उपस्थित होते.
फोटो