Halloween party ideas 2015


अमळनेर येथे प्रभाग 14 मध्ये पंचायत समितीचे सदस्य भिकेश पाटील यांच्या सहकार्याने वृक्षारोपन (ट्री गार्डसह) मोहीम.
अमळनेर प्रतिनिधी-
अमळनेर नगरपरिषद प्रभाग क्र.14 च्या नगरसेविका कमलबाई पितांबर पाटील व युवा नेते भिकेश पावबा पाटील पंचायत समिती सदस्य, अमळनेर यांच्या अध्यक्षते खाली वाजत्री लावून रैली द्वारे जनजागृती करून प्रभागातील सर्व ओपन प्लेस (खुला भूखंड) मधे निम, चिंच, वड, आंबे, पिंपळ इ.वृक्षाचे ट्री गार्डसह वृक्षारोपन मोहीम प्रभागातील नागरिकाच्या हस्ते राबवण्यात आली.
पंचायत समितीचे सदस्य व भारतीय युवा मोर्चाचे अध्यक्ष भिकेश पाटील यांनी सांगितले की सध्या अमळनेर तालुक्यात वृक्षारोपणाचा पंधरवडा साजरा केला जात आहे .जास्तीत जास्त वृक्षांची लागवड करून त्याची संवर्धनही केले जाणार आहे त्यासाठी भारतीय युवा मोर्चाच्या माध्यमातून उपक्रम राबविला जात आहे. सध्या पावसाचे प्रमाण कमी झाल्यामुळे वृक्षारोपण करणे ही काळाची गरज आहे याचे महत्त्व लक्षात घेऊन अमळनेर तालुक्यातील पर्यावरण प्रेमी नागरिकांना ती गार्ड वृक्ष उपलब्ध करून दिल्याचे समाधान मिळत आहे.
  पंचायत समितीचे सदस्य भिकेश पाटील यांचे स्वागत रवींद्र पाटील यांनी केले.
सामाजिक कार्यकर्ते  रवि पाटील, राजेंद्र यादव, महेश पाटील आर.डि.पाटील, विलास पवार, श्रीराम सोनवणे, दिलीप पाटील, मधुकर कोळी, विनायकराव जाधव,ईश्वर महाजन सर, शिंदे सर, एल.बी.पाटील, नाना पाटील, बागल सर, मिलिंद सदानंशिव आप्पा, माळी सर, देसाई बापू, संजय पाटील, श्रीकृष्ण सोनवणे, भागवत पाटील, देवरे सर, देसाई सर, संजय बाविस्कर, दगडू सोनार, भोई सर, कैलास सोनवणे, खाटिक सर, विजय येवले, चौधरी सर, देसाई बापू, विजय पाटील, गोविंद नेरकर, कपिल पाटील, अश्विन पाटील, अरुण बाळापूरे, कविष पाटील, ललित चौधरी, प्रमोद पाटील, किशोर जाधव, दशरथ जाधव, प्रेमा चव्हाण, राहुल शिंपी, कल्पेश साळुंखे, किशोर पाटील, प्रवीण ठाकरे, महेश खैरनार, विवेक तेले, शिंगाणे सर, विकास महाजन, योगेश पाटील, रोशन पाटील, सागर विसपुते, योगेंद्र बाविस्कर, मोहित पवार, सागर पाटील, बापू कोळी, योगेश भदाणे, चेतन पवार, भगीरथ पाटील, यश अहिरे, कुणाल पाटील, प्रवीण वाघ इ.परिसरातील महिला व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

WhatsApp वर क्लिक करा बातमी मिळवा

लोकप्रिय बातम्या

महत्वाच्या घडामोडी

Powered by Blogger.