सर्वत्र अभिनंदन!
अमळनेर प्रतिनिधी-
जून महिन्यात घेण्यात आलेल्या युजीसी नेट परीक्षेत कु.पुजा अशोककुमार टाक ही प्रथम श्रेणीत ऊत्तीर्ण झाली असून,या आधी
कवयत्रि बहिणाबाई चौधरी विद्यापीठात एम.ए.इंग्रजी विषयात विशेष प्रावीण्य पटकाविले आहे.तिने नेट परीक्षासाठी नॅशनल टेस्टींग एजंसी (N.T.A.)द्वारा
रिसर्च फेलोशिप व सहाय्यक प्राध्यापक पदासाठीचा अभ्यासक्रमाची निवड केली होती.या नंतर कवयत्रि बहीणाबाई
चौधरी ऊत्तर महाराष्ट्र विद्यापीठातून पी.एच.डी.करण्याचा तिचा
मनोदय आहे.या यशाबद्दल सर्व स्तरातून तिचे अभिनंदन होत आहे.
| कु.पुजा हि किनोद हायस्कूलचे दिवंगत शिक्षक ए.टी.मारवाडी
(टाक) यांची द्वितिय कन्या तर कळमसरे शिक्षण संस्थेचे प्रशासन अधिकारी ,माजी सरपंच,जी,टी.टाक यांची पुतणी आहे.