भाजपचा एकनिष्ठ कार्यकर्ता म्हणून वरिष्ठ पातळीवर आमदारकीच्या तिकीटासाठी प्रयत्न करणार.
दिनेश बापू माळी
अमळनेर प्रतिनिधी- भाजपचे कट्टर समर्थक, भारतीय युवा मोर्चाचे माजी तालुकाध्यक्ष दिनेश बापू माळी भाजपकडून आमदार कीसाठी तिकीट मिळावे यासाठी वरिष्ठ पातळीवर प्रयत्न करणार आहेत. दिनेश बापू माळी भाजप पक्षात गेल्या पंचवीस वर्षापासून कार्य करीत आहेत .आतापर्यंत आणि अनेक पदे भूषवली आहेत त्यांचा अमळनेर तालुक्यातील गोतावळा मोठा आहे. पक्षाने त्यांना त्यांना संधी दिल्यास भाजपच्या वतीने आमदारकी लढवण्यासाठी ते इच्छुक आहेत. त्यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले की भाजपच्या तिकिटावर आमदारकी लढविण्यासाठी इच्छुक असून मी पुढच्या आठवड्यात भाजपचे जिल्हाध्यक्ष व ज्येष्ठ नेत्यांना उमेदवारीसाठी साकडे घालणार आहे . मला उमेदवारी का मिळू नये ?मी गेल्या वीस ते पंचवीस वर्षापासून पक्षाचा जुना कार्यकर्ता व पदाधिकारी आहे .त्यामुळे पक्षाने मला संधी दिल्यास निश्चितच मी आमदारकी लावण्यासाठी तयार आहे व त्यासाठी माझ्या पातळीवर हालचाली सुरू आहेत असे सांगितले.
दिनेश भाऊराव माळी हे भिलाली तालुका अमळनेर येथे सरपंचपद भूषविले असून त्या अगोदर त्यांचे वडील, पत्नी यांनीही सरपंचपद भूषविले आहे. मुलगा उपसरपंच पद भूषवित आहे. अमळनेर तालुक्यात माळी समाजाचे उपाध्यक्ष ,अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे तालुकाध्यक्ष ,महात्मा फुले हायस्कूल धरणगावचे माजी चेअरमन अशी अनेक पदे त्यांनी भूषविली आहेत. अमळनेर तालुक्यात माळी समाजही मोठ्या प्रमाणावर आहे. दिनेश माळी यांना सामाजिक कामाची आवड असल्याने आतापर्यंत संघटनेच्या माध्यमातून अनेक कामे केली आहेत. तालुक्यातील प्रत्येक गावात बापूनां मानणारा सर्व समाजातील वर्ग आहे.
व इतर समाजातही दिनेश बापूंना मानणारा वर्ग आहे. पक्षाने त्यांना संधी दिल्यास निश्चितच आमदारकी लढून आमदार होतील अशी आज परिस्थिती आहे.अमळनेर तालुक्याच्या समस्यांना निश्चीतच वाचा फोडण्याचं काम दिनेश बापूंच्या माध्यमातून होईल अशी सध्या चर्चा सुरू आहे.