महाराष्ट्र राज्य विदयुत मंडळाच्या नवीन मीटर बसविल्याने सामान्य नागरिकांना जास्तीच्या बीलाबाबत आंदोलन करणार.
पकंज चौधरी
सदस्य-जिल्हा नियोजन समिती.
अमळनेर प्रतिनिधी-म. रा. रा. वि. वि. कंपनी मार्फत शहरात जे नवीन मीटर बसविले जात आहे . ऐच्छिक आहे ते गरज नसताना सुस्थितीतील मीटर देखील बद्दलवण्याचे काम कंपनी मार्फत केले जात आहे. नवीन मिटर अतिशय जास्त बिल देत असल्याने नागरिकांची मोठी लुट होणार आहे. तरी सर्वांनी जागृत राहून मिटर बसवणाऱ्यां ना स्पष्ट पणे नकार द्या यांनी जर ही मनमानी तात्काळ बंद केली नाही तर याबाबत निवेदन देऊन लवकरच आंदोलन करणार आहे असे पकंज चौधरी जिल्हा नियोजन समितीचे सदस्य यांनी सांगितले.