फुले दाम्पत्य स्मारकाची मागणी
अमळनेर (प्रतिनिधी) तालुक्यातील आदर्शगाव देवगाव-देवळी येथील माळी समाज शिष्टमंडळाने फुले दाम्पत्य स्मारक विषयी आमदार शिरीष चौधरी यांची दि.१४ रविवार रोजी पदाधिकाऱ्यांसह भेट घेतली
संत सावता माळी पुण्यतिथी सप्ताह निमित्त तालुक्यातील विविध प्रलंबीत कामे बाबत महाराष्ट्र माळी समाज महासंघाचे प्रदेश संघटक व क्रांतीसुर्य महात्मा फुले विचार मंच चे संस्थापक प्रविण महाजन यांच्या सूचनेनुसार प्रलंबित कामा बद्दल पडताळणी करण्यात येत आहे. देवळी येथील फुले दाम्पत्य भव्य स्मारक आणि विविध मागणी संदर्भात सावित्रीमाई फुले जयंती दिनी महाराष्ट्र माळी समाज महासंघ तर्फे मागणी निवेदन देण्यात येऊन पुन्हा त्या संदर्भात पाठपुरावा करण्यात आला होता. त्या नंतर आज संत सावता महाराज पुण्यतिथी सप्ताह निमित्त शिष्ट मंडळाने आमदारांची भेट घेतली यावेळी महासंघाचे मार्गदर्शक प्रा.झेड.एन. माळी देवळी येथील सरपंच व महाराष्ट्र माळी समाज महासंघाचे ता.सरचिटणीस अशोक गणपत माळी,प्रवीण माळी, युवक तालुक्याध्यक्ष शिवाजी महाजन, नगरसेवक धनंजय महाजन,सुरेश पाटील,नगरसेवक देविदास महाजन,प्रमोद पाटील यांच्यासह पदाधिकारी कार्येकर्ते उपस्थित होते.