महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघटनाचे
अंगणवाडी केंद्रांच्या समायोजनाला* (बंदला) विरोध करणेसाठी जळगाव येथे मोर्चा.
अमळनेर प्रतिनिधी
दि.16 जुलै 2019 रोजी सकाळी 11.00 वाजता.
♦ जमण्याचे ठिकाण-शिवतीर्थ मैदान (जी.एस.ग्राऊंड) जळगाव
जळगाव जिल्ह्यातील 3472अंगणवाडी केंद्रांपैकी 500 मीटर (अर्धा कि.मी.) अंतर्गत येणाऱ्या सुमारे 2336 अंगणवाडी केंद्रांचे समायोजन करून बंद करण्याची प्रक्रिया जिल्हा परिषद जळगाव ने सुरू केली आहे. त्यामुळे सुमारे 4600 अंगणवाडी सेविका,मदतनिस व मिनी सेविका बेरोजगार होणार आहेत. अंगणवाडी सेविका, मदतनिस व मिनी सेविका ह्या विधवा, निराधार, घटस्पोटीत, प्रौढ कुमारिका,परित्यक्ता तसेच कुटुंब प्रमुख महिला कर्मचारी आहेत. समायोजनामुळे त्यांच्या भविष्यातील उदरनिर्वाहाचा गंभीर प्रश्न शासनाने निर्माण केला आहे. त्यामुळे एकही अंगणवाडी केंद्राचे समायोजन करू दिले जाणार नाही. असा निर्धार संघटनेने केला आहे. त्यासाठी आंदोलनाचा थर आणि जोर संघटनेच्या माध्यमातून अंगणवाडी कर्मचाऱ्यांना वाढवावा. जिल्हासह राज्यातील एक अंगणवाडी केंद्राचे कोणत्याही परिस्थितीत समायोजन व अंगणवाडी कर्मचाऱ्यांना बेरोजगार करू नये.
◾अंगणवाडी केंद्राचे काम जलदगतीने होणेसाठी सेविकांना मोबाईल हँडसेट शासनाने मे-2019 मध्ये पुरवठा केला आहे. परंतु बहुतांश मोबाईल हँडसेट नादुरुस्त व बिघाड झालेले आहेत व होत आहेत. ते दुरूस्त करण्यासाठी सेविकांना पैसे खर्च करायला वरिष्ठ भाग पाडत.अशांची चौकशी करून त्यांचेवर कायदेशीर कारवाई करावी.मोबाईल दुरुस्तीची जबाबदारी शासनाने घ्यावी किंवा मोबाईल दुरूस्तीसाठी सेविकांना निधी उपलब्ध करून द्यावा.
◾ शिरूड,फत्तेपूर,गारखेडा या बिटातील अंगणवाडी कर्मचाऱ्यांना मागील थकीत मानधन विनाविलंब अदा करावे.
◾मा.सचिव, महिला व बालविकास विभाग यांच्या आदेशानुसार अंगणवाडी सेविका, मदतनिस व मिनी अंगणवाडी सेविकांना ओळखपत्र शासकीय खर्चातून पुरविण्यात यावेत.
◾अंगणवाडी कर्मचाऱ्यांना थकीत प्रवास भत्त्याची रक्कम तात्काळ अदा करण्यात यावी.
◾खडकी बु. ता.चाळीसगाव येथील अंगणवाडी सेविका व मदतनिस यांच्याशी हुज्जत घालणा-या व अश्लिल शिवीगाळ करणा-या इसमाविरूध्द कठोर कारवाई करावी व सेविका मदतनिसांना संरक्षण देण्यात यावे.
◾अंगणवाडी सेविका, मदतनिसांच्या रिक्त जागा भरण्यासाठी लावलेले निर्बंध तात्काळ उठवून जागा भरण्याची प्रक्रिया विनाविलंब सुरू करण्यात यावी.
या व अन्य जिल्हास्तरीय प्रश्न व अडचणी सोडविण्यासाठी *दि.16 जुलै 2019 रोजी जिल्हा परिषद जळगाव* वर संघटनेच्या वतीने मोर्चा आयोजित करण्यात आला आहे व प्रश्न सुटेपर्यंत धरणे आंदोलन करण्यात येणार आहे. तरी जिल्ह्यातील अंगणवाडी सेविका, मदतनिस व मिनी अंगणवाडी सेविका यांनी बहुसंख्येने मोर्चात भागिदारी करून यशस्वी करावा. असे आम्ही आवाहन करीत आहोत.
*सुचना* - ज्या अंगणवाडी सेविका,मदतनिस व मिनी अंगणवाडी सेविकांनी सन 2018 ची सभासद वर्गणी व लढानिधि तसेच सन 2019 ची सभासद वर्गणी भरली नसेल त्यांनी तात्काळ संघटनेकडे भरणा करावी हि विनंती.
🇮🇩 *टिप - मोर्चासाठी सर्वांनी शिवतीर्थ मैदान (जी.एस. ग्राऊंड) जळगाव येथे सकाळी 11.00 वाजेपर्यंत एकत्र जमावे.*
नेतृत्व
मायाताई परमेश्वर, रामकृष्ण बी. पाटील, युवराज बैसाणे, ॲड. गजानन थळे, दत्ता जगताप, सुमंत कदम, सुधीर परमेश्वर, अमोल बैसाणे, सर्व कार्यकर्ते व पदाधीकारी