Halloween party ideas 2015

सावित्रीबाई फुले यांच्या विचारांचे पुजन करा-
मुख्याध्यापक अनिल महाजन
सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त चित्रकला हस्ताक्षर .व वकृत्व स्पर्धेचे आयोजन
अमळनेर प्रतिनिधी- सावित्रीबाई फुले या हाडाच्या शिक्षिका होत्या समाजाच्या सुखदुःखाची त्यांना जाण होती सामाजिक जीवनात कार्यकर्त्यांना त्यांना असे दिसले की या देशातील शूद्रातिशूद्र समाज हा व्यसनांचा गुलाम आहे या व्यसनांच्या राक्षसी मगरमिठीतून हा समाज सोडल्या शिवाय त्याचा विकास होऊ शकत नाही त्यासाठी त्यांनी सविस्तरपणे लोक प्रबोधन करण्याचा प्रयत्न केला व्यसनापासून मनुष्याची बुद्धी भ्रष्ट होते व माणुसकी नष्ट होते हे सावित्रीबाईंचे विचार अंगिकारले तर समाजामध्ये व्यसनाधीनता पूर्णपणे नष्ट होईल .सावित्रीबाई यांच्या प्रतिमापुजनापेक्षा विचारांचे पुजन व्हावे तरच खऱ्या अर्थाने सावित्रीमाईंना श्रद्धांजली ठरेल असे गौरवोद्गार महात्मा फुले हायस्कूल देवगाव देवळी येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त वकृत्व स्पर्धेत कार्यक्रमाचे  अध्यक्षस्थानावरून शाळेचे मुख्याध्यापक अनिल महाजन बोलत होते.
    व्यासपीठावर शाळेचे ज्येष्ठ शिक्षक अरविंद सोनटक्के, ईश्वर महाजन सुरेश महाजन एच.ओ.माळी, लिपिक एन.जी. देशमुख होते अगोदर कार्यक्रमाचे अध्यक्ष व शाळेचे मुख्याध्यापक अनिल महाजन व शिक्षक यांनी सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून माल्यार्पण केले. 3 जानेवारी सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त चित्रकला स्पर्धा हस्ताक्षर स्पर्धा घेण्यात आल्या व स्पर्धा परीक्षक म्हणूनअरविंद सोनटक्के व एच.ओ. माळी यांनी काम पाहिले.
    सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त वकृत्व स्पर्धेत शाळेतील 35 विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला त्यातून प्रत्येक स्पर्धेमधून पहिल्या चार विद्यार्थ्यांना बक्षीसे शिक्षक ईश्वर महाजन, अरविंद सोनटक्के यांच्याकडून मान्यवरांच्या शुभ हस्ते बक्षिसे वाटप करण्यात आले.
   हस्ताक्षर स्पर्धेत
प्रथम सुरज महाजन इयत्ता दहावी दितीय अश्विनी माळी इयत्ता दहावी तृतीय गोकुळ जगताप इयत्ता दहावी उत्तेजनार्थ तनुजा माळी इयत्ता नववी
चित्रकला स्पर्धेत
प्रथम खुशी डांगे इयत्ता नववी दितीय नंदिनी डांगे इयत्ता आठवी तृतीय सुरज महाजन इयत्ता दहावी उत्तेजनार्थ निखिल माळी इयत्ता दहावी
वकृत्व  व कथाकथन स्पर्धेत
प्रथम-अश्विनी माळी(इयत्ता१०वी)
द्वितीय-खुशी डांगे(९ वी)
तृतीय-माधवी सपकाळे(१० वी)
उत्तेजनार्थ-हर्षाली महाजन(९ वी)
वरील सर्व मान्यवरांच्या हस्ते बक्षीसवितरण करण्यात आले.
    शाळेत इंग्रजी विषयाचे एच.ओ.माळी यांची तंज्ञ मार्गदर्शक म्हणून निवड झाल्याबद्दल व शिक्षक  ईश्वर महाजन यांची उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार मिळाल्याबद्दल शाळेचे मुख्याध्यापक अनिल महाजन व शिक्षकांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.कार्यक्रमाचे सुत्रसंचालन शिक्षक ईश्वर महाजन यांनी तर आभार प्रर्दशन एस.के.महाजन यांनी केले.यावेळी शाळेचे विद्यार्थी मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते.
फोटो

WhatsApp वर क्लिक करा बातमी मिळवा

लोकप्रिय बातम्या

महत्वाच्या घडामोडी

Powered by Blogger.