अमळनेर-
येथील कु.भावना जितेंद्र झाबक सी.ए.ची परीक्षा उत्तीर्ण झाली आहे. इयत्ता १० वीतही तिने ९३ टक्के गुण मिळवून डी. आर.कन्या शाळेतुन गुणवत्ता यादीत स्थान मिळवले होते. तिने पुणे येथून बी एम सी सी महाविद्यालयातून वाणिज्य शाखेत पदवी पर्यंतचे शिक्षण पूर्ण केले.ती स्व. शांतीलालजी माणकलालजी झाबक यांची नात तर व्यापारी सेना शहर आघाडीचे अध्यक्ष आणि अरिहंत फर्निचर चे मालक जितेंद्र शांतीलालजी झाबक यांची कन्या आहे.
कु. भावनाच्या या यशात तिला संपूर्ण झाबक परिवारचे अनमोल सहकार्य लाभले. मुथ्था अँड लाहोटी फर्म , पुणे यांचे मार्गदर्शन लाभले. तिच्या या यशाबद्दल सर्वत्र तिचे कौतुक व अभिनंदन होत आहे.