मराठी पत्रकार परिषदेच्या शिष्टमंडळाने एस एम देशमुख यांच्या नेतृत्वाखाली मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची घेतली भेट
अमळनेर प्रतिनिधी
मराठी पत्रकार परिषदेच्या एका शिष्टमंडळाने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची सह्याद्री अतिथीगृहावर भेट घेऊन पत्रकारांच्या विविध प्रश्न व त्यांच्याकडे मांडले या शिष्टमंडळात परिषदेचे विश्वस्त किरण नाईक, परिषदेचे अध्यक्ष गजानन नाईक, कार्याध्यक्ष शरद पाबळे तसेच ज्येष्ठ पत्रकार मंदार पारकर आदींचा समावेश होता. पत्रकारांच्या वतीने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा सत्कार करण्यात आला. ज्येष्ठ पत्रकारांना पेंशन देताना मोठ्या प्रमाणावर पक्षपात होत असल्याची तक्रार एस.एम देशमुख यांनी केली. सन्मान योजनेच्या अटी अत्यंत जाजक असल्याने ज्येष्ठ पत्रकार या योजनेपासून वंचित राहत असल्याची तक्रार मुख्यमंत्र्यांकडे करून त्यातील जाचक अटी रद्द कराव्यात अशी मागणी करण्यात आली. त्यावर कोणावरही अन्याय होणार नाही याची काळजी घेऊन नियमात योग्य त्या दुरुस्त्या करण्याचे आश्वासन मुख्यमंत्री ठाकरे यांनी दिले. यावेळी मुख्यमंत्र्यांच्या दिलेल्या निवेदनात छोट्या वृत्तपत्रांची पडताळणी स्थगिती देण्यात यावी, युट्युब आणि पोर्टलसाठी नियमावली तयार करून त्यावर सरकारी जाहिराती देण्याची मागणी करण्यात आली तसेच ज्या जिल्ह्यात पत्रकार भवनाच्या इमारती नाहीत तेथे इमारत उभारण्यासाठी जागा आणि निधी उपलब्ध करून देण्याची मागणी यावेळी करण्यात आली या मागण्यांच्या सकारात्मक पद्धतीने विचार करण्याचे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले.