Halloween party ideas 2015

पोदार जंबो किडसमध्ये स्पोर्ट्स इव्हेंट
कार्यक्रम उत्साहात संपन्न

चिमुकल्यानीं विविध स्पर्धेत मिळवली बक्षिसे


अमळनेर प्रतिनिधी

आज दिनांक 18/01/2020 रोजी पोदार जंबो किड्स मध्ये स्पोर्टस इव्हेंट मराठा कॉलनी परिसरातील भव्य पटांगणात उत्साहात पार पडला.

या कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून ख्यातनाम बालरोगतज्ञ *डॉ.श्री. अभिजित बाविस्कर* व वॉर्ड क्रमांक 13 च्या नगरसेविका *ताईसो. सौ चंद्रकला साळुंखे* यांची उपस्थिती लाभली



स्पोर्ट्स इव्हेंटची थीम होती *जंबो ऑन व्हील्स* यात सर्व प्रथम प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते हवेत गॅस बलून सोडून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. त्यानंतर प्रमुख पाहुण्यांचा सत्कार गुलाबपुष्प देऊन करण्यात आला त्यानंतर मुलांनी *ब्राझील* या गाण्यावर वेलकम डान्स केला.... त्यानंतर विद्यार्थी रोज करत असलेल्या प्राणायाम ,योगा पोझेस , सुर्यनमसकार व *पोदार जंबो ची खासियत असलेले पॅराशूट प्ले चे प्रदर्शन* उपस्थित प्रेक्षकांसमोर केले. मुलांना वाहतुकीच्या साधनांची माहिती करून देण्यासाठी विविध मनोरंजक खेळांचे आयोजन करण्यात आले त्यात " ऐरोप्लेन रेस,हेलिकॉप्टर रेस, कार रेस, मेक अ ट्रेन, ट्रॉट लाईक या हॉर्स, मेक अ झेब्रा क्रॉसिंग, सिग्नल रेस, फाईंड मी, ऍबुलन्स पझल, ऐरोप्लेंन पझल, डाईस रेस"अश्या मुलांच्या विविध स्पर्धा घेण्यात आल्या.. त्याच प्रमाणे *पेरेन्ट्स* च्या देखील विविध स्पर्धा घेण्यात आल्या... स्पर्धेनंतर सर्व विद्यार्थ्यांना *मेडल्स व प्रमाणपत्र* देऊन गौरविण्यात आले.. कार्यक्रम यशस्वीतेसाठी पोदार जंबो किड्स अमळनेर च्या सर्व स्टाफ व सर्व सहकारी मित्रांचे मोलाचे सहकार्य लाभले.

WhatsApp वर क्लिक करा बातमी मिळवा

लोकप्रिय बातम्या

महत्वाच्या घडामोडी

Powered by Blogger.