बोरघर / माणगाव ( विश्वास गायकवाड )
माणगाव तालुक्यातील महिला व बालविकास विभाग एकात्मिक बालविकास सेवा योजना प्रकल्प माणगाव अंतर्गत साई आदिवासी वाडी येथील अंगणवाडी सेविका सुप्रिया मोरे व मदतनीस साक्षी पवार यांना सन२०१९-२०मध्ये उत्कृष्ट कामकाज केल्याबाबत पुरस्कार प्रदान करण्यात आला.
सदरचा पुरस्कार माणगाव कुणबी भवन येथे २४ जानेवारी रोजी बेटी बचाओ बेटी पढाओ या कार्यक्रमा निमित्त प्रदान करण्यात आला. या कार्यक्रमासाठी माणगाव उपाविभागीय अधिकारी प्रशाली दिघावकर, माणगाव तहासिलदार प्रियंका आयरे, माणगाव पंचायत समिती सभापती राजेश पानावकर, माजी सभापती तथा विद्यमान सदस्य सुजित शिंदे, गटविकास अधिकारी सतीष गाढवे, माणगाव प्रकल्प अधिकारी सीमा ठाकरे, डॉ . परदेशी व आदी मान्यवर तसेच अंगणवाडी सेविका, आशाताई यांची प्रमुख उपस्थिती होती.
