Halloween party ideas 2015


अमळनेर प्रतिनिधी
संविधानातील मूलभूत अधिकारांचे वाण पुढच्या पिढीला देण्यासाठी लढत रहा! सरकार हमसे डरती है। पुलिस को आगे करती है! लोकांचा लढण्याचाही अधिकार हिसकविण्याचे काम दबावतंत्राच्या माध्यमातून सुरू आहे असे आवाहन सामाजिक कार्यकर्त्या मेधाताई पाटकर यांनी पुरोगामी विचार मंच च्या वतीनं दिवंगत सामाजिक कार्यकर्त्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ आयोजित विवेक जागर कार्यक्रमात 'भारतीय संविधान धोक्यात!' या विषयावर बोलतांना छ.शिवाजी महाराज नाट्यगृह येथे केले.
संविधानाने दिलेला मूलभूत जगण्याचा अधिकार च आज धोक्यात आहे.देशाच्या भावी नागरिकांना,विद्यार्थ्यांना विद्यापीठात घुसून शस्त्र हाती घेऊन मारझोड करणाऱ्या मूलतत्त्ववादी घुसखोरांना देशाबाहेर काढण्याची गरज आहे. संविधानाचा प्रत्येक भाग वाळवी प्रमाणे पोखरण्याचे काम सुरू आहे.समतेच्या आणि न्यायाच्या तत्वावर विकास झाला पाहिजे संविधानाच्या कलम ३९ मधिल मुठभरांच्या हाती देशातील संपत्ती जाऊ नये या तत्वाच्या विरोधात मुठभरांच्या हाती संपत्ती चे केंद्रीकरण करण्याचे काम सरकार ने केले आहे.जातीवादी हिंसेच्या माध्यमातून संविधान धोक्यात आहे म्हणून देशभर आंदोलनांची मांदियाळी पसरली असून हिम्मतीने लढणाऱ्या कार्यकर्त्यांना सलामी दिली पाहिजे.असेही मेधा पाटकर यांनी सांगितले
धर्माच्या नावावर देश फोडण्याचा प्रयत्न करणारे मोदी -शहा आणि त्यांची व्हाट्सअप्प युनिव्हर्सिटी म्हणजे संविधानावर आलेले संकट आहे.असे प्रतिपादन यावेळी लोकसंघर्ष मोर्चा च्या प्रणेत्या प्रतिभा शिंदे यांनी केले.सेवादलाचे जिल्हाध्यक्ष प्रा अशोक पवार आजच्या परिस्थितीत परिवर्तनाच्या चळवळीत कार्यकर्ते सहभागी झाले पाहिजे केंद्र शासनाच्या धर्मांध व्यवस्थेविरुद्ध पेटून उठले पाहिजे म्हणून विवेक जागर सुरू केला आहे असे अध्यक्षीय भाषणात सांगितले. प्रास्ताविक सामाजिक कार्यकर्त्या भारतीताई गाला यांनी करतांना दिवंगत कार्यकर्त्यांच्या आठवणींना उजाळा दिला. सूत्रसंचालन सामाजिक कार्यकर्ते संदिप घोरपडे यांनी केले.प्रमुख वक्त्यांची परिचय पत्रकार धनंजय सोनार यांनी सादर केला.जेष्ठ सामाजिक कार्यकर्त्या मेधाताई पाटकर यांचे स्वागत सत्कार आ.अनिल पाटील यांनी केले.
यावेळी सभागृहात धुळे येथिल जेष्ठ कार्यकर्ते गोपी लांडगे, संपादक रत्नदीप शिसोदिया ,दर्शना पवार,डॉ उदय खैरनार, एस डी देशमुख, गांगुर्डे, राजेश पांडे,सामाजिक कार्यकर्ते रणजित शिंदे , मंगला पवार, साहित्यिक कृष्णा पाटील,निवृत्त उपजिल्हाधिकारी एच टी माळी,रविंद्र पांडे,पी वाय पाटील,किरण बहारे, धनगर दला पाटील,जेष्ठ नागरिक संघटनेचे मुंडके,पोलिस निरीक्षक अंबादास मोरे ,अशोक बिऱ्हाडे, गौतम सपकाळे , प्रा.लिलाधर पाटील,रियाज मौलाना ,ऍड शकील काझी,नगरसेवक शेखा हाजी,पत्रकार मुन्ना शेख आदी उपस्थित होते. राष्ट्र सेवा दल,छात्र भारती विद्यार्थी संघटना,अंधश्रद्धा निर्मूलन समिती व पुरोगामी मित्र परिवार अमळनेर चे कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.
चौकट
अपर्णा मुट्ठे, सौ तिलोत्तमा पाटील,रंजना देशमुख,प्रा जयश्री साळुंखे आदिंसह अमळनेर महिला मंच आणि मुस्लिम शिष्ट मंडळाने मेधाताई पाटकर यांचा सत्कार केला

WhatsApp वर क्लिक करा बातमी मिळवा

लोकप्रिय बातम्या

महत्वाच्या घडामोडी

Powered by Blogger.