महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री व अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगनरावजी भुजबळ यांची अ.भा.महात्मा फुले समता परिषदेच्या पदाधिकाऱ्यांनी घेतली सदीच्छा भेट.
अमळनेर प्रतिनिधी-
महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री व अन्न व नागरी पुरवठा मंत्री आदरणीय छगनरावजी भुजबळ यांची त्यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट झाली त्या वेळी धरणगाव चे माजी आमदार हरिभाऊ महाजन एरंडोल तालुका काग्रेसचे अध्यक्ष व विजयजी महाजन ज्येष्ठ नेते सुकलाल महाजन अमळनेरचे अ.भा.महात्मा फुले समता परीषदेचे जेष्ट पदाधिकारी दिनेश माळी व पारोळा तालुका अध्यक्ष पिरणकुमार अनुष्ठान यांनी भुजबळ साहेबांशी मुंबई येथे सदीच्छा भेट घेऊन त्यांचा सत्कार केला.
जळगांव जिल्ह्यातील काही प्रश्नावर चर्चा करून अ.भा.महात्मा फुले समता परिषदेच्या संघटनावर चर्चा करण्यात आली. आगामी काळात संघटन मजबूत करण्यासाठी भर दया असे भुजबळ यांनी सांगितले.