Halloween party ideas 2015

अमळनेर प्रतिनिधी


संतुलित आहार व व्यायामाने स्रिया राखू शकता आपले आरोग्य डॉ, स्वप्ना पाटील यांचे प्रतिपादन
शिंपी समाज आदर्श महिलामंडळा चा हळदीकुंकू समारंभ नुकताच नामदेव पायरी शिंपी समाज मंदिरात पार पडला सदरहू कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सौ, पुष्पाबाई भांडारकर व प्रमुखपाहुणे म्हणून डॉ, स्वप्ना पाटील या होत्या तसेच व्यासपीठावर समाज अध्यक्ष रंजना मांडगे समाज तालुका अध्यक्ष मनिषा शिरसाठ व जिल्हा प्रतिनिधी भारती भांडारकर विराजमान होत्या त्या प्रसंगी डॉ, पाटील यांनी स्रियांच्या आरोग्यविषयक अनमोल मार्गदर्शन केले त्यात मासिक पाळीतील समस्या त्यावेळी घ्यावयाची काळजी स्तनाच्या व गर्भपिशवीच्या होण्यार्या कर्करोगाची कारणे लक्षणे व त्यावरील उपाय तसेच किशोरवयीन मुलींच्या समस्या याविषयी सखोल माहिती दिली, व स्रियांच्या आरोग्यासाठी महिलांना संतुलित आहार व योग्य व्यायाम करण्याचा सल्लाही दिला, सदरहू कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ, छाया ईसे यांनी केले कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी अध्यक्ष, रंजना मांडले, उपाध्यक्ष चंद्रकला खैरनार, सचिव छाया ईसे ,सदस्या भारती भांडारकर, मीनाक्षी खैरनार, रत्नमाला जगताप, लता खैरनार, प्रतिभा सोनवणे, मनिषा शिरसाठ, जयश्री भांडारकर, जयश्री शिंपी यांनी परिश्रम घेतले कार्यक्रम प्रसंगी महिला भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या

WhatsApp वर क्लिक करा बातमी मिळवा

लोकप्रिय बातम्या

महत्वाच्या घडामोडी

Powered by Blogger.