पं. स. माणगांव शिक्षण विभाग व भाटे विद्यालय , गणित विज्ञान अध्यापक मंडळ माणगांव च्या संयुक्त विद्यमाने ४५ व्या तालुका विज्ञान प्रदर्शनाचे भाटे विद्यालयात शानदार आयोजन
बोरघर / माणगांव ( विश्वास गायकवाड ) शालेय विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक जीवनात वैज्ञानिक दृष्टिकोन वृद्धिंगत करण्यासाठी '' शाश्वत विकासासाठी नाविन्यपूर्ण विज्ञान आणि तंत्रज्ञान '' या ब्रीद वाक्या नुसार माणगांव पंचायत समिती शिक्षण विभाग, एस के भाटे विद्यालय बोरवाडी, गणित आणि विज्ञान अध्यापक मंडळ माणगांव यांच्या संयुक्त विद्यमाने ४५ व्या तीन दिवसीय माणगांव तालुका विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन गुरुवार दिनांक २६ , २७ आणि २८ डिसेंबर रोजी माणगांव तालुक्यातील निजामपूर विभागात असलेल्या श्रीमती एस के भाटे विद्यालय बोरवाडी येथे करण्यात आले आहे.
सदर माणगांव तालुका विज्ञान प्रदर्शन सोहळ्याचे उदघाटन गुरुवार दिनांक २६ डिसेंबर रोजी सकाळी ११ वा माणगांव, महाड आणि पोलादपूर चे लोकप्रिय आमदार भरतशेठ गोगावले विधानसभा सदस्य महाराष्ट्र राज्य यांच्या शुभहस्ते माणगांव पंचायत समिती सभापती सुजित शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली नवनिर्वाचित लोकप्रिय आमदार अदितीताई तटकरे विधानसभा सदस्य महाराष्ट्र राज्य , आमदार अनिकेत तटकरे विधानसभा सदस्य महाराष्ट्र राज्य , नरेश पाटील सभापती शिक्षण क्रिडा व आरोग्य समिती राजिप अलिबाग , अॅड. आस्वादजी पाटील अध्यक्ष राजिप अलिबाग, मा. ममता फोंडके उपसभापती पंचायत समिती माणगांव, यांच्या प्रमुख उपस्थितीत आरती मोरे राजिप, शिक्षण समिती सदस्या, स्वाती नवगणे राजिप सदस्या,अमृता हरवंडकर राजिप सदस्या, वासंती वाघमारे सदस्या राजिप, राजेश पानवकर सदस्य पं स, महेंद्र तेडगुरे पं स सदस्य, माधवी समेळ पं स सदस्या, अलका केकाणे पं स सदस्या, अलका जाधव पं स सदस्या, शैलेश भोनकर पं स सदस्य, सतीश गाढवे गटविकास अधिकारी पं स माणगांव, नितीन पवार, तन्वी साखळे आणि संतोष रणपिसे इत्यादी प्रमुख अतिथींच्या उपस्थितीत संपन्न होणार अाहे.
सदर ४५ व्या माणगांव तालुका विज्ञान प्रदर्शनात संपूर्ण माणगांव तालुक्यातील प्राथमिक आणि माध्यमिक शाळेचे विद्यार्थी आणि त्यांचे शिक्षक, पालक आणि माणगांव तालुक्यातील तमाम शिक्षण व विज्ञान प्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित राहतील. सदर ४५ व्या माणगांव तालुका विज्ञान प्रदर्शनाची रुपरेषा पुढील प्रमाणे प्रदर्शनाचा पहिल्या दिवशी अर्थात गुरुवार दिनांक २६ डिसेंबर २०१९ रोजी सकाळी ९ ते ९ : ३० नोंदणी, सकाळी ९ ते ११ प्रतिकृती मांडणी, सकाळी ११ ते १२:३० उदघाटन समारंभ, दुपारी २ ते ३ निबंध स्पर्धा ( दोन्ही गट ) दुपारी १२:३० ते ५ प्रदर्शन पाहण्यासाठी खुले. दुसऱ्या दिवशी शुक्रवार दिनांक २७ डिसेंबर रोजी सकाळी ११ ते दुपारी १ प्रश्नमंजुषा आणि वकृत्व स्पर्धा दोन्ही गट त्या नंतर दुपारी १ ते ५ परिक्षण. हा संपूर्ण दिवस प्रदर्शन पाहण्यासाठी खुले राहिल. तिसऱ्या दिवशी अर्थात शनिवार दिनांक २८ डिसेंबर रोजी सकाळी ८ ते १० वाजता परिक्षण त्या नंतर सकाळी ८ ते ११ प्रदर्शन पाहण्यासाठी खुले त्या नंतर सकाळी ११ ते दुपारी १ वाजता माणगांव पंचायत समिती सभापती मा. सुजित शिंदे यांच्या शुभहस्ते व अध्यक्षतेखाली व उपसभापती ममता फोंडके यांच्या प्रमुख उपस्थितीत सह प्रमुख अतिथींच्या उपस्थितीत पारितोषिक वितरण आणि सदर कार्यक्रमाचा समारोप करण्यात येईल असे सदर माणगांव तालुका विज्ञान प्रदर्शन कार्यक्रमाचे संयोजक, निमंत्रक एक आर कुशिरे मुख्याध्यापक एस के भाटे विद्यालय बोरवाडी, एस आर मोहिते वरिष्ठ विस्तार अधिकारी शिक्षण, भिमराव आंबेतकर कनिष्ठ विस्तार अधिकारी शिक्षण, एस पी चव्हाण अध्यक्ष गणित अध्यापक मंडळ, नंदकिशोर ढाकणे अध्यक्ष विज्ञान अध्यापक मंडळ आणि सर्व केंद्र प्रमुख, सर्व मुख्याध्यापक, माध्यामिक प्राथमिक शाळा, सर्व साधन व्यक्ती, सर्व कर्मचारी वृंद पंचायत समिती माणगांव शिक्षण विभाग सर्व प्राथमिक व माध्यमिक शिक्षक संघटना माणगांव यांनी दिलेल्या प्रसिध्दी पत्रकात म्हटले आहे.