ब्राम्हणशेवगेे येथील सामाजिक कार्यकर्ते पत्रकार सोमनाथ माळी यांची *राज्यस्तरिय पर्यावरण रत्न* पुरस्कारासाठी निवड :२७ डिसेंबर रोजी जळगाव येथे वितरण
----------------------------
*चाळीसगाव*-: तालुक्यातील ब्राम्हणशेवगेे येथील सामाजिक कार्यकर्ते लोकसंघर्ष मोर्चाचे प्रसिध्दी प्रमुख, *चेतना News मराठी Live* चे संपादक सोमनाथ शामराव माळी यांची सामाजिक,शैक्षणिक व पर्यावरण क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केल्याबदल महाराष्ट्र् शासन छत्रपती शिवाजी महाराज राज्यस्तरिय वनश्री पुरस्कार प्राप्त निसर्ग मित्र समिती धुळे व ग्रामीण विकास शिक्षण संस्था नाशिक कै.आण्णासाहेब बाबूलाल देवचंद पगार याचे स्मरणार्थ राज्यस्तरिय पर्यावरण रत्न पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे. तशा आशयाचे पत्र निसर्ग मित्र समिती धुळेचे संस्थापक प्रेमकुमार अहिरे ग्रामीण विकास शिक्षण संस्था नाशिकचे सरचिटणीस रमेश आप्पा पगार यांनी पत्रकाद्वारे कळवले आहे. सदर पुरस्कार वितरण समारंभ मान्यवरांचे उपस्थितीत शुक्रवार दि.२७ डिसेंबर २०१९ रोजी जळगाव येथील जिल्हा परिषद सभागृहात होणार आहे.
त्याच्या या निवडीबद्दल लोकसंघर्ष मोर्चा व मित्र परिवाराकडून स्वागत करण्यात आले आहे.
