शालेय राष्ट्रीय डॉजबॉल स्पर्धेत महाराष्ट्र मुले-मुली संघ उपविजयी ----------------
जळगांव प्रतिनिधी
सतना मध्यप्रदेश येथे दि २० ते २४ डिसेंबर दरम्यान आयोजित शालेय राष्ट्रीय डॉजबॉल स्पर्धेत महाराष्ट्र राज्याच्या मुले व मुली संघाने उपविजेतेपद पटकाविले अंतिम सामने मध्यप्रदेश संघाशी झाले उपविजयी संघास सतना चे आमदार सिद्धार्थ कुशवाह यांचे हस्ते उपविजेतेपदाचे चषक देऊन सन्मानित करण्यात आले या संघाचे स्पर्धा पूर्व सराव शिबीर जळगाव येथील जिल्हा क्रीडा संकुलात आयोजित करण्यात आले होते उपविजयी संघाचे जिल्हा क्रीडा अधिकारी मिलींद दिक्षित,महाराष्ट्र डॉजबॉल असोसिएशनचे उपाध्यक्ष राजेश जाधव,शिवछत्रपती पुरस्कार्थी डॉ नारायण खडके,क्रीडा अधिकारी एम के पाटील यांनी अभिनंदन केले आहे महाराष्ट्चे उपविजयी संघ याप्रमाणे *मुले संघ*- यश ढोबळे व आदित्य निर्मळ (अमरावती),कार्तिकेश पाटील (नाशिक),निखिल म्हस्के (औरंगाबाद), सुबोध उईके (नागपूर),सत्यम गोवेकर (सातारा),विकासचंद्र बारीक (ठाणे), शुभम करताळे (अमरावती),ऋतुराज गायकवाड (सांगली), आनंद जगताप (सोलापूर), संघ प्रशिक्षक नौशाद शेख, सातारा *मुली संघ*- साक्षी खलाटे व रितू क्षीरसागर (सातारा), रेश्मा टिकले (नागपूर), अर्पिता वाघमारे (अमरावती), एकता पाटील व अमिता तराळ (कोल्हापूर), आर्या जाधव (पुणे), दुर्गा बोरगे (औरंगाबाद), आरती द्वाहदर (नाशिक), यशोदा पाटील (लातूर) संघप्रशिक्षक उमेश बोढरे सातारा, संघ व्यवस्थापक गिरीश पाटील जामनेर.
