धरणगाव-(दि-२८) आदर्श माध्यमिक विद्यालय धरणगाव येथील इयत्ता ८ वी विद्यार्थिनींनी सादर केला सकाळच्या गुलाबी थंडीत सुंदर आदर्श परिपाठ
अमळनेर प्रतिनिधी
शनिवार दि.२८ डिसेंबर रोजी वर्गशिक्षिका वैशाली बाविस्कर यांच्या मार्गदर्शनाखाली इयत्ता आठवी च्या बलिकांनी सादर केला सुंदर असा परिपाठ
" फुलं फुलत आहे कळी उमलत आहे सकाळच्या या गुलाबी थंडीत आमचा परिपाठ फुलतं आहे परिपाठाच्या या सुंदर ओळींना उपस्थित विद्यार्थ्यांनी दाद दिली
राष्ट्रगीतापासून परिपाठाची सुरुवात झाली प्रतिज्ञा, प्रार्थना, संविधान वाचन, हे चार सदर विद्यार्थ्यांनी सामूहिक रित्या सादर केलेत*
पंचाग,सुविचार, म्हणी, सुभाषीत ,श्लोक,दिनविशेष, बातम्या, वाढदिवस, समूहगीत, प्रश्नमंजुषा, व्यक्तीविशेष, चिंतन, बोधकथा, काव्यगायन, पाढे, ओमकार मौन हे परिपाठतील सदर विद्यार्थ्यांनी आत्मविश्वासाने सादर केलीत
भूमिका देशमुख, हर्षला पाटील, पूनम सोनवणे, रोहिणी चव्हाण, काजल माळी, रितू पाटील, दिपाली सातपुते, वैष्णवी चव्हाण या विद्यार्थिनींनी सदर अप्रतिम सादर केलेत तर*
*दक्षता पाटील या विद्यार्थिनींने सुंदर सूत्रसंचालन केले*
*या सुंदर उपक्रमाचे सर्वांनी भरभरून कौतुक केले*
*परिपाठ यशस्वी होण्यासाठी मुख्यद्यापाकासह उपशिक्षक किरण चव्हाण, पी ए पाटील, तुषार नाईक, मुकेश तोरवणे, बाबाजी मासुळ, फिलीप गावित, प्रवीण पाटील यांनी सहकार्य केले.*
*या सुंदर उपक्रमाचे कौतुक संस्थेचे अध्यक्ष सी के पाटील,व संस्थेच्या सचिव सौ सुरेखा पाटील यांनी केले आहे*
