Halloween party ideas 2015



राजकीय क्षेत्रात प्रवेश करणार नाही सामाजिक संघटन मजबूत करणार
माळी समाजातील सर्व राजकीय लोक समाज हितासाठी एकत्र करणार --- प्रविण महाजन 


अमळनेर प्रतिनिधी-(शिवाजी महाजन)* 

अमळनेर:-आगामी विधानसभा निवडणूक लढवण्या संदर्भात प्रविण महाजन उमेदवारी करणार असल्याची चर्चा अमळनेर तालुक्यासह परिसरात जोरदार सुरू असून मोठ्या प्रमाणावर युवकांनी त्यांच्या भेटी घेतल्या आहेत.माळी समाजाचा उमेदवार देण्यासाठी आम्ही प्रयत्नशील असून कार्येकर्त्यांच्या व पदाधिकाऱ्यांच्या इच्छे नुसार त्यांनी जो निर्णय घेतला तीच पूर्वदिशा राहील किंवा योग्य वेळी निर्णय घेतला जाईल. माळी समाजातील मते निर्णायक असून समाजाने ठरवल्यास तोच वेक्त्ती आमदार होईल असेही त्यांनी स्पष्ट केले.
       मी सामाजिक क्षेत्रातील कामे करत असून समाज संघटनाची मोठी जबाबदारी माझ्यावर आहे.राजकीय क्षेत्रात येण्याचा कोणताही विचार नसून सामाजिक क्षेत्रातील कार्याची ताकद किती तरी पटीने मोठी आहे.माळी समाजातील सर्व राजकीय पक्षातील नेते पदाधिकाऱ्यांना समाज हितासाठी एका छताखाली आणण्याचे काम जोरदार सर्वत्र जिल्ह्यात सुरू आहे.असे महाराष्ट्र माळी समाज महासंघाचे प्रदेश संघटक व  क्रांतीसुर्य महात्मा फुले विचार मंचचे संस्थापक,माळी समाजाचे युवा नेते प्रवीण बी.महाजन यांनी नुकत्याच झालेल्या समाजाच्या जिल्हा बैठकी नंतर कार्येकर्त्यांशी संवाद साधतांना सांगितले. यावेळी त्यांनी आगामी विधानसभा निवडणुकी संदर्भात  उमेदवारी न करण्या बाबत आपली भूमिका स्पष्ट केली.त्यांनी पुढे सांगितले की राजकीय फायद्यासाठी युवकांचा वापर फक्त स्वार्थासाठी होत असून काम संपल्यावर त्यांना वाऱ्यावर सोडले जाते अश्या लोकांन पासून युवकांनी सावधान राहिले पाहिजे आपण आर्थिकदृष्ट्या कसे सक्षम राहू याचा विचार प्रत्येकाने करावा युवकांनी व्यापार क्षेत्राकडे आपले लक्ष केंद्रित करावे यावेळी असंखे पदाधिकारी कार्येकर्ते उपस्थित होते.

WhatsApp वर क्लिक करा बातमी मिळवा

लोकप्रिय बातम्या

महत्वाच्या घडामोडी

Powered by Blogger.