Halloween party ideas 2015



वैजापूर विकास नागरिक कृती समितीच्या शेकडो कार्यकर्त्यांनी येवल्यात घेतली छगन भुजबळ यांची भेट

वैजापूर विधानसभा मतदार संघातून उमेदवारी करण्यासाठी भुजबळांकडे केली मागणी.

येवल्यातील कार्यकर्त्यांचा भुजबळांसमोर ठिय्या

अमळनेर प्रतिनिधी


नाशिकसह येवला मतदारसंघात गेल्या पंधरा वर्षांपासून प्रचंड विकास करून येवल्याचा चेहरा मोहरा बदलला आहे. यापुढील काळात दुष्काळाच्या छायेत असलेल्या वैजापूर मतदारसंघाचा विकास करण्यासाठी छगन भुजबळ किंवा कुटुंबियातील कोणीही सदस्य यांनी वैजापूरमधून उमेदवारी करावी यासाठी वैजापूर विकास नागरिक कृती समितीच्या वतीने आज वैजापूर येथील सर्वपक्षीय नेत्यांच्या शिष्टमंडळाने शेकडो कार्यकर्त्यांसह येवला संपर्क कार्यालय येथे भेट घेऊन मागणी केली.

यावेळी प्रहारचे तालुकाध्यक्ष ज्ञानेश्वर घोडके, मनसे तालुकाध्यक्ष सुनिल गायकवाड,वंचित बहुजन आघाडी जिल्हा उपाध्यक्ष जगन्नाथ गायकवाड, बाबासाहेब गायकवाड, नीलेश चाफेकर,  अशोक देवकर, एल. एम.पवार,काशिनाथ गायकवाड,सुभाष गायकवाड, अॅड. साईनाथ दारुंटे, डॉ. वाल्मिक बोढरे, गणेश चांगले, निशांत पवार, प्रा. संतोष विरकर,आबासाहेब गायकवाड,भोरु पाटील पवार, चंद्रकांत पेहरकर, साहेबराव पडवळ, विजय बनकर, प्रभाकर पवार ,मनोज घोडके,बाळासाहेब शिंदे,पुंडलीक गायकवाड,आदी उपस्थित होते.


वैजापूर मतदारसंघ येवला मतदारसंघापासून जवळच असूनही विकासापासून कोसो मैल दूर आहे. वैजापूर विधानसभा मतदारसंघाला यथोचित,योग्य नेतृत्व न लाभल्यामुळे वैजापूर मागास परिस्थितीत असून वर्षानुवर्षे दुष्काळाच्या छायेत खितपत पडला आहे. वैजापूर मतदार संघाला पाणीदार करण्यासाठी व विकास करण्यासाठी सक्षम नेतृत्वाशीवाय पर्याय नाही. आपनास आम्ही सक्षम नेतृत्व म्हणून पहातो नाशिकसह येवल्याचा केलेला विकास हा संपूर्ण महाराष्ट्रासमोर रोल मॉडेल आहे. आमची मागणी जात धर्म पक्षभेदाच्या पलीकडे असून विकासाच्या मुद्द्यावर आम्ही एक आहोत. वैजापूर मतदार संघाच्या स्थानिक व सामान्य नागरिकांचे आपण नेतृत्व करावे अशी मागणी यावेळी भुजबळ यांच्याकडे कार्यकर्त्यांनी केली.


यावेळी छगन भुजबळ यांनी सर्व कार्यकर्त्यांचे मनोगत समजून घेत आभार मानले. ते म्हणाले की, गेल्या पन्नास वर्षांपासून राजकारणात सक्रियपणे काम करत असून जनतेची सेवा करणे हा मुख्य उद्देश आहे. त्यामुळे कुठे उमेदवारी करावी याबाबत पक्ष स्तरावर निर्णय घेतला जाईल. कार्यकर्त्यांनी आपल्या भावना प्रतिनिधीकडे मांडणे हा त्यांचा अधिकार आहे त्यामुळे वैजापूर, येवल्यातील कार्यकर्त्यांनी आपल्या भावना मांडल्या मी त्यांचा आदर करतो. विधानसभेची निवडणूक भुजबळ कुटुंबातील केवळ दोनच व्यक्ती लढणार आहे. एका वेळेस तीन लोक उमेदवारी करणार नाही त्यामुळे माझ्यासाठी सर्व पत्ते खुले आहे.पक्ष काही निर्णय घेणार असेल तर मी थांबूही शकतो किंवा कोणत्याही मतदारसंघातून लढूही शकतो असे त्यांनी यावेळी स्पष्ट करून आपल्या भावना पक्षाच्या वरिष्ठांकडे पोहचवू असे त्यांनी उपस्थित कार्यकर्त्यांना सांगितले.

यावेळी येवला मतदारसंघातील कार्यकर्ते जमा होऊन त्यांनी 'भुजबळ साहेबांना आम्ही येवल्यातून जाऊ देणार नाही' भुजबळ साहेब येवल्यातच राहणार' अशा घोषणा देऊन छगन भुजबळ यांनी येवल्यातूनच उमेदवारी करावी यासाठी संपर्क कार्यालयाबाहेर ठिय्या मांडला. यावेळी छगन भुजबळ यांनी कार्यकर्त्यांची भेट घेऊन कार्यकर्त्यांचे आभार मानून समजूत काढत पक्ष घेईल त्याप्रमाणे निर्णय घेऊ असे त्यांना यावेळी सांगितले.

WhatsApp वर क्लिक करा बातमी मिळवा

लोकप्रिय बातम्या

महत्वाच्या घडामोडी

Powered by Blogger.