Halloween party ideas 2015


.......यशपंढरी संचालित........
आई जिजाऊ अभ्यासिका 

प्रयत्नातून यश हमखास मिळते.

माजी पोलीस आयुक्त साहेबराव पाटील.

अमळनेर प्रतिनिधी

अमळनेर येथे आज दि. 11 जुलै रोजी माजी पोलिस आयुक्त साहेबराव पाटील यांनी भेट दिली. या भेटीत त्यांनी विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षा व करीयर याविषयी अनमोल असे मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांना अभ्यासाविषयी व अभ्यास पध्दतीविषयी मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांना त्यांच्या अडचणी आल्या तर त्यांचे निराकरण कसे करावे याची सूत्रे दिली. स्पर्धा परिक्षेतुन यश साधता येते आणि भावी आयुष्यात केलेला अभ्यासाचा कसा फायदा होतो याची जाणीव करून दिली तसेच यश नाही मिळाले तर खचून जाऊ नये. यासारखे अनमोल मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांना उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या व काही त्रुटी आढळल्यास त्यांचे निराकरण करण्यात येईल अशी ग्वाही दिली. यशपंढरी संचालक पवन लोहार यांनी त्यांचा सत्कार केला. त्यांच्यासमवेत राहुल पाटील, सागर साळी, विशाल साळी यांनी सहकार्य केले.

WhatsApp वर क्लिक करा बातमी मिळवा

लोकप्रिय बातम्या

महत्वाच्या घडामोडी

Powered by Blogger.