Halloween party ideas 2015


जम्बो किड्स मधील मुलांची निघाली हरीत दिंडी.               

अमळनेर प्रतिनिधी

आषाढी एकादशीच्या निमित्ताने पोदार जम्बो किड्स अमळनेर येथील चिमुकल्या मुलांनी 'झाडे लावा झाडे जगवा '  हा संदेश देत परिसरातील नागरिकांना सीड् बॉल गिफ्ट केले, तसेच वृक्ष लागवड व संवर्धन का आवश्यक आहे हे देखिल आरुषी स्वपनिल पाटील या विद्यार्थीनीने कवितेच्या माध्यमातून समजावून सांगितले . गजानन महाराज मंदिरात  जावून मुलांनी विठ्ठल  रुखुमाईचे दर्शन  घेतले . हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी  शाळेच्या प्रिन्सिपल सौ. निलीमा कुडे,   शिक्षक सौ. स्वप्ना लाले, सौ. अनिता नेरकर, सौ. नुतन पाटील , सौ. जयश्री पाटील, सौ. सुनिता पाटील यांचे सहकार्य लाभले.

WhatsApp वर क्लिक करा बातमी मिळवा

लोकप्रिय बातम्या

महत्वाच्या घडामोडी

Powered by Blogger.