यात्रा उत्सवातील भाविकांनी वृक्ष पायदळी तुडणार नाही याची काळजी घ्या.
अमळनेर प्रतिनिधी
अमळनेर तालुक्यातील तमाम बंन्धुनो, व माता भगिनींनो तसेच बाल मित्रांनो आपणांस कळविण्यात आम्हाला आनंद होत आहे की
अमळनेर येथील संताच्या प्रसिद्ध व पावन तसेच प्रती पंढरपुर म्हणुन ओळखली जाणारी अमळनेर नगरीतील श्री. अंबरीष ऋषि महाराज टेकडीवरील यात्रा ही द्वादस आषाढ शु.१२ शके १९४१ संवत २०७४ तारीख १३/७/२०१९. शनिवार रोजी येत आहे. तरी द्वादस तिर्थ क्षेत्र श्री. अंबरीष महाराज मंदिर संस्थांन व टेकडी ग्रुप तर्फे यात्रेला येणार्या भाविकांचे हार्दिक स्वागत. आपण सर्व मिळून ही यात्रा आनंदोत्सवाने साजरी करणार आहोत.
पण..?
श्री. अंबरीषजी ऋषि महाराज व टेकडी परिसर विषयी काही थोडे जाणून घेवूया श्री. अंबरीषजी ऋषि हे मोठ्या कुल घराण्यातील १६ वे गादीपुरुष राजा होते व ते दंडयोग तपचर्या साठी हिमालय पर्वतावर त्यांनी तपचर्या केल्यानंतर अमळनेर येथील टेकडीच्या जवळपास ४० /५० एकर पठारावर त्यांनी जपतप तपचर्या करुन श्रीहरी विष्णु देवता व शिवशंकर देवताची आराधना करुन टेकडी पावन व शुद्ध तसेच स्वर्गमय केली आहे आणि हेच पावित्र्य आपणांस सुद्धा जोपासायचे आहे.
आपणांस कळविण्यात अत्यंत आनंद होत आहे की अमळनेर येथील श्री. अंबरीषजी ऋषि महाराज टेकडीवर
मा, आयकर आयुक्त (औरंगाबाद) श्री. संदिपजी साळुंखे यांच्या मार्गदर्शनाने श्री. अंबरीष महाराज टेकडी ग्रुप ने टेकडी परिसरात वृक्ष लावणे व जगवणे तसेच चारी खणुन पाणी जिरविण्याचे व ड्रमच्या ( कँन ) सहाय्याने टेकडी परिसराच्या कान्याकोपर्या पर्यंत वृक्षांना पाणी देण्याचे कार्य हे श्रमदानातुन व लोकसहभागातुन टेकडी ग्रुप करत आहे. आजवर टेकडी परिसरात जवळपास ६५०० वृक्षरोपण केले आहेत. तसेच त्या वृक्षांना पाणी देणे त्यांची निगा ठेवणे व त्यांना जगवणे हे पर्यावरणाला पोषक व सृष्टि साठी महत्वपूर्ण तसेच हे एक दैविक कार्य हे करत आहे. व दिनांक ८ जुलै २०१८, रविवार रोजी सकाळी ११ वाजून ११ मिनिटांनी अंबरिष टेकडीवर १ मिनिटात १,१११ वृक्षारोपणाच्या आदर्श पर्यावरणपूरक अभिनव राष्ट्रीय उपक्रमात आपल्या सहकार्यामुळेच आम्ही करू शकलो. अंबरिष टेकडीवर आजपर्यंत शेकडो झाडे लावून ती वाढविली आहेत. त्यामुळे अंबरिष टेकडीचे पर्यावरण बदलून टेकडीचे नैसर्गिक सौंदर्य वाढण्यास मदत झाली आहे. तरी आपणा सर्वांना आम्ही कळकळीची विनंती करत आहोत🙏 की आपण टेकडीवर यात्रेला किंवा यात्रे नंतर कधीही आल्यावर नास्ता व जेवण केल्यावर उरलेले अन्न व कागद,युज & थ्रो काही वस्तु रद्दी पेपर अश्या वस्तु इकडे तिकडे न फेकता सरळ आपण आणलेल्या (कँरिबँग) पिशवीत भरुन श्री. अंबरीषजी ऋषि महाराज टेकडी ग्रुप सदस्यांन कडे जमा करावी किंवा श्री. अंबरीषजी ऋषि महाराज मंदिरा जवळच मोठा ओटा आहे त्याच्या मागिल बाजूस नेऊन टाकावी ही नम्र विनंती.
मित्रांनो व बंन्धु भगिनींना आमची 🙏 हात जोडुन कळकळीची नम्र विनंती आहे की श्री.अंबरीषजी महाराज टेकडी परिसरात टेकडी
ग्रुप ने वृक्षारोपण केले आहे. व आपल्या पाल्या सारखे संगोपण व रक्षण केले आहे तरी आपणास हात जोडुन नम्र विनंती आहे की आपण आपआपल्या गाड्या व मोटारसायकली टेकडीच्या खालच्या बाजुस लावावी व आपण ही चालतांना फिरतांना आपल्या मुळे आपल्या पायदळी वृक्षांचे नुकसान होणार नाही याची काळजी घ्यावी ही नम्र विनंती.
बंन्धुनों व माता, भगिनींनो तसेच बालमित्रांनो.आणखी महत्वाचे म्हणजे.. टेकडीच्या खाली पायर्यांन जवळ व टेकडी च्या दर्यांन मध्ये
सी.सी.टी,अंतर्गत बंधार्याचे खोलीकरण पाणी अडविण्यासाठी काम सुरु आहे. तरी आपण येतांना व जातांना काळजी पुर्वक लक्ष ठेवून सावधानी ने टेकडी भ्रमण करावी व जिथे पाण्याचा डाब दिसेल तिथे कृपया जाऊ नये किंवा पाण्यात उतरु नये ही नम्र विनंती.
हर..हर..महादेव..
झाडे लावा ! झाडे जगवा!!
पाणी अडवा ! पाणी जिरवा !!
चला.. एक तरी वृक्ष टेकडीवर लावुया...
श्री. अंबरीषजी ऋषि महाराज की जय...
फोन – ९९२३९३३३५५
आपलाच
श्री. अंबरीषजी महाराज टेकडी ग्रुप अमळनेर .जिल्हा जळगांव
Whats App Group – चला अमळनेर सुंदर करूया