अमळनेर प्रतिनिधी
अमळनेर तालुक्यातील यशवंत माध्यमिक व उच्च माध्यमिक आदिवासी आश्रम शाळा पिंपळे बु. येथील उपशिक्षक सतीश हरी कागणे यांना ओबीसी शिक्षक-पालक असोसिएशन धुळे यांच्यावतीने सन 2019 चा गुरू गौरव पुरस्कार 28 नोव्हेंबर या दिवशी जाहीर झाला होता. व हा पुरस्कार दिनांक 25 डिसेंबर रोजी धुळे येथे मान्यवरांच्या उपस्थितीत प्रदान करण्यात आला. यावेळी श्री सतीश कागणे यांचे वडील, पत्नी गवते मॅडम, मुलगा गुरुराज, मुलगी देवश्री, तसेच आश्रम शाळेचे मुख्याध्यापक श्री उदय पाटील, उपशिक्षक प्रवीण पाटील, उपस्थित होते. श्री कागणे यांना पुरस्कार मिळाल्यामुळे श्री चिंतामणी महिला एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्षा माईसाहेब विद्याताई पाटील, मार्गदर्शक नानासाहेब युवराज पाटील, सर्व संचालक मंडळ यांनी अभिनंदन करून यापुढेही असेच कार्य करत राहावे अशा शुभेच्छा दिल्या. तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनीही शुभेच्छा दिल्या
