शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे राज्य अधिवेशन
गणपतीपुळे येथे आयोजन- डी.पी.महाले.नाशिक विभागीय कार्यवाह.
महाराष्ट्रराज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा शिक्षकेतर संघटनांचे महामंडळ यांच्यातर्फे शिक्षकेतर कर्मचारी ४८ वे राज्यस्तरीय अधिवेशन येत्या ५ जानेवारी २०२० रोजी रत्नागिरी जिल्ह्यातील गणपतीपुळे येथे आयोजित केले आहे.
या अधिवेशनाच्या माध्यमातून राज्यातील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित प्रश्नांकडे शासनाचे लक्ष वेधण्यात येणार आहे. गेल्या २०-२५ वर्षांपासून कर्मचाऱ्यांच्या मागण्या शासनाकडे करण्यात येणार आहेत.अशी माहिती महामंडळाचे नाशिक विभाग कार्यवाह डी. पी.महाले यांनी दिली आहे.
या अधिवेशनास राज्याचे लोकनेते व राष्ट्रवादी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष माननीय शरदरावजी पवार प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार असून कार्यक्रमाचे अध्यक्ष खासदार सुनील तटकरे व स्वागताध्यक्ष डॉक्टर दिलीप मुरारी आदी उपस्थित राहणार आहेत. विशेष अतिथी म्हणून खासदार विनायक राऊत, शिक्षक आमदार विक्रम काळे, आमदार डॉक्टर सुधीर तांबे, आमदार कपिल पाटील,आमदार भास्कर जाधव,आमदार किशोर दराडे, आमदार नागो गणार, आमदार बाळाराम पाटील आदी आमदारांच्या उपस्थितीत अधिवेशन तात्यासाहेब मुळे माध्यमिक विद्यालय जाकादेवी गणपतीपुळे. ता.जिल्हा.रत्नागिरी येथे संपन्न होत आहे.
या अधिवेशनात शासनाने आकृती बंधाबाबत शासनाने नियुक्त केलेल्या समितीने सादर केलेला अहवाल जशाच्या तसा मंजूर करून शिक्षकेतर कर्मचारी भरती प्रक्रिया तात्काळ सुरू करण्यात यावी. राज्य शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे १०,२०,३० या टप्प्यांच्या लाभ देण्यात यावा. शिक्षकेतर कर्मचारींना २४ वर्षांची कालबंध पदोन्नती विनाअट शिक्षकांप्रमाणे सुरू करण्यात यावी, अनुकंपा तत्वाने भरती सुरु करण्यात यावी, शै.पात्रता वाढवली असल्यास विनाअट शिक्षकपदी पदोन्नती वेतनश्रेणीवर मिळावी.प्रयोग शाळा सहाय्यक ग्रंथपाल व शिपाईपदाची वेतनश्रेणी बक्षी समितीकडे दुरूस्तीसाठी शिफारस करावी.शालेय कार्यालयात पदनाम बदल होण्यासाठी प्रयत्न व्हावेत.अशा शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या विविध विषयांवर चर्चा करण्यात येणार आहे. शिक्षकेतर महामंडळाचे ९ वर्षे राज्य अध्यक्ष म्हणून मा.शरदरावजी पवार यांनी काम केले आहे. त्यामुळे शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या समस्या पवार साहेबांना माहिती असल्याने या राज्यांच्या शालेय शिक्षण मंत्री यांच्याकडून या मागण्या मान्य होण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.
या अधिवेशनाच्या यशस्वी होनेकामी शिक्षकेतर महामंडळाचे राज्याचे कार्यवाह श्री शिवाजीराव खांडेकर,राज्य अध्यक्ष अनिल माने ,कार्याध्यक्ष मोरेश्वर वासेकर,नाशिक विभागीय कार्यवाह डी.पी.महाले, कोषाध्यक्ष सुखदेव कंद आदि प्रयत्नशील आहेत.
आपला विश्वासू...
डी.पी.महाले.
नाशिक विभागीय कार्यवाहक राज्य शिक्षकेतर महामंडळ.
