40 वा खान्देश निरंकारी संत समागम उत्साहात संपन्न
अमळनेर प्रतिनिधी
अमळनेर तालुक्यातील शेकडोंच्या संख्येने साध संगत सेवादल चे सर्व सदस्य व अधिकारी अमळनेर शाखेचे मुखी श्रीचंद निरंकारी व प्रेस प्रतिनिधी श्री.शशिकांत पाटील* यांच्या सह भाविक भक्तांनी पिंपळनेर येथील 40 वा खान्देश निरंकारी संत समागम मेळाव्यात सहभाग घेतला विशेष म्हणजे जळगाव, धुळे आणि नंदुरबार तीन जिल्हे मिळून या संत मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.
या प्रसंगी मुख्य मंचावर *प.आ.ब्रिजमोहनजी सेठी* यांनी आपले निखळ वाणीतून संतांचे विचार आत्मसात करून मानवाने जीवन प्रवास केल्यास जीवनाच्या कायापालट होतो संत हे समाजाचे खरे मार्गदर्शक असून मानवाला खरी दिशा दाखवितात संत हे जगाच्या कल्याणासाठी जन्म घेतात त्यामुळे जीवनात प्रत्येकाला संत मानवतेचा संदेश देतात संत समागमाने जीवन नौका पार होते असे प्रतिपादन दिल्ली येथील बृजमोहन शेट्टी यांनी केले.
*या समागमासाठी धुळे झोनचे इन्चार्ज श्री हिरालाल जी पाटील* यांच्या मार्गदर्शनाखाली नियोजन करण्यात आले होते.
यासाठी स्थानिक *पिंपळनेर शाखेचे मुखी,ज्ञानप्रचारक श्री जगदीश ओझरकर जी* यांनी सर्व साधसंगत व सेवादल यांना सोबत घेउन या समागमाची रूपरेषा आखण्यात आली. यावेळी संपूर्ण 36ब धुळे झोन मधील हजारोंच्या संख्येने भाविक भक्तगण उपस्थित होते.जळगाव क्षेत्रातील सर्व सेवादल युनिट चे सेवादल सदस्य सेवादल अधिकारी व बहन जी यांनी अथक परिश्रम घेऊन कार्यक्रमाला सुंदर रूप दिले.
या कार्यक्रमाचे मंच संचालन श्री मिलिंद बाविस्कर जी यांनी केले. झोन अंतर्गत सर्व शाखेचे मुखी,संयोजक, ज्ञानप्रचारक, प्रबंधक उपस्थित होते.
या 40 वर्षाचा प्रवास ,इतिहास रूपाने विवरण दिलं गेलं. याचे संकलन *आ.सिताराम पाटील, आ.भिकाजी पाटील, जगदीश ओझरकर, प्रताप जी दादा,आ. राजकुमार वाणी इ.* यांनी केले . व विशेष पुरवणी प्रकाशित करण्यात आली. समागमा मध्ये आलेल्या महापुरुषांना कॅन्टीन, प्रकाशन ,डिस्पेंसरी, ज्ञान कक्ष, सेवादल आँफीस, प्याऊ इ. व्यवस्था करण्यात आली होती व तसेच आलेले सर्व भाविकांना महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले..
खान्देशातील युवा महात्म्यांनी (NYS सदस्य) अथक परिश्रम घेऊन 40 वर्षाच्या प्रवासाचे संकलन करून झोनची पुस्तिका तयार केली तिचे *विमोचन प.आ.शेठीजी यांचे हस्ते प.आ.हिरालीलजी पाटील व युवा महात्मा* यांचे उपस्थितीत केले याचे विस्तारीत विवरण *म.राजकुमार जी वाणी* यांनी केले.... शिस्तबध्द, अनुशासन पालन करीत संपन्न झालेल्या या समागमाचे कौतुक परिसरीतील नागरिकांनी केले.
