मनवंतराव साळुंखे यांनी घेतला आयोजक शाळेच्या शिक्षकांच्या मदतीने उत्कृष्ट परिपाठ
दि २४ शेळावे ता पारोळा
आज शेळावे केंद्राची ५ वी शिक्षण परिषद जि प केंद्र शाळा शेळावे बु॥ व जि प प्राथ शाळा धाबे ता पारोळा यांच्या संयुक्त विदयमानाने शेळावे येथे घेण्यात आली . या परिषदेच्या अध्यक्षपदी केंद्र प्रमुख जितेंद्र पवार हे होते .मान्यवरांच्या हस्ते देवी सरस्वती, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, व पूज्य साने गुरुजी यांच्या प्रतिमांचे माल्यार्पण करून पूजन करण्यात आले . सुरुवातीला शेळावे बु॥ व धाबे शाळेतील आदर्श विदयार्थी व आदर्श विदयार्थीनी तसेच सांकृतिक कार्यक्रमात भाग घेणाऱ्या विद्यार्थ्यांना विविध शैक्षणिक साहित्य धाबे शाळेच्या शिक्षकांकडुन बक्षिस देण्यात आले . शिक्षण परिषदेच्या उद्देशानुसार धाबे शाळेचे मुख्याध्यापक मनवंतराव साळुंखे यांनी शिक्षकांच्या मदतीने उत्कृष्ट असा परिपाठ सादर करून राष्ट्रगीत ते मौन पर्यंत सर्व घटकांचे महत्व स्पष्ट केले . शेळावे शाळेचे शिक्षक हेमराज पाटील यांनी ज्ञानरचनावादावर आधारीत इ १ ली गणित विषयाचा आदर्श पाठ शैक्षणिक साहित्याचा वापर करुन रंजक पध्दतीने सादर केला . श्रीमती जयश्री पाटील यांनी मराठी भाषा समृद्ध करण्यासाठीचे छान व सोपे उपयुक्त उपक्रम स्पष्ट केले . श्रीमती भारती पाटील यांनी गणित आशय समृध्दी पेटीचा वापर कसा कौशल्यपुर्ण करावा हे प्रात्यक्षिक पुर्ण विवेचन सादर केले . श्रीमती शशिकला बोरसे यांनी इतिहास हा विषय विदयार्थ्यांना कसा रंजकपुर्ण, प्रेरणा, स्फूर्ती देणारा करता येईल याचे आवेशपुर्ण स्पष्टीकरण केले . धाबे शाळेचे वरीष्ठ शिक्षक गुणवंतराव पाटील यांनी विदयार्थी स्थलांतर रोखण्यासाठी उपाययोजना व उपक्रम सांगितले .
केंद्र प्रमुख जितेंद्र पवार यांनी मासिक आढावा घेत शाळा सिद्धी ऑन लाईन भरणे, यु - डायस माहिती भरणे, अध्यक्ष चषक संघ तालुक्यावर नेणे, निष्ठा प्रशिक्षण, सगुण विकास कार्यक्रम माहिती भरणे, स्वर्ण महोत्सवी शिष्यवृत्ती वाटप याबाबत सखोल मार्गदर्शन केले .
सूत्र संचलन मनवंतराव साळुंखे तर आभार गुणवंतराव पाटील यांनी मानले . कार्यक्रम यशस्वीतेसाठी सर्वच शिक्षकांचे सहकार्य लाभले .
