Halloween party ideas 2015


पुज्य सानेगुरुजी ग्रंथालयात व मोफत वाचनालयात सानेगुरुजी जयंती साजरी

अमळनेर प्रतिनिधी-पुज्य सानेगुरुजी ग्रंथालय व मोफत वाचनालय अमळनेर येथे सानेगुरुजी जयंती उत्साहपूर्ण वातावरणात साजरी करण्यात आली.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सानेगुरुजी वाचनालयाचे अध्यक्ष दिलीप सोनवणे होते पूज्य साने गुरुजी यांच्या प्रतिमेचे पूजन वाचनालयाच्या उपाध्यक्ष डॉ. माधुरी भांडारकर  व चिटणीस प्रकाश वाघ यांनी केले. तर साने गुरुजी यांच्या प्रतिमेला माल्यार्पण वाचनालयाचे  विश्वस्त बापू नगावकर यांनी केले. साने गुरुजींचा विचारांचा प्रचार व प्रसार झाला पाहिजे प्रत्येक घरातील विद्यार्थ्यांनी साने गुरुजींचे पुस्तक वाचले पाहीजे असे  वाचनालयाचे अध्यक्ष दिलीप सोनवणे व उपाध्यक्ष  डॉ प्रा.माधुरी भांडारकर यांनी आपल्या मनोगतातून सांगितले. यावेळी वाचनालयाचे संयुक्त चिटणीस सुमीत धाडकर व संचालक भीमराव जाधव प्रसाद जोशी दीपक वाल्हे,पी.एन.भादलीकर,निलेश पाटील, अँड रामकृष्ण उपासनी ईश्वर महाजन उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वाचनालयाचे चिटणीस प्रकाश वाघ यांनी केले तर आभार  संचालक भिमराव जाधव  यांनी मानले.यावेळी वाचनालयाचे कर्मचारी उपस्थित होते.

WhatsApp वर क्लिक करा बातमी मिळवा

लोकप्रिय बातम्या

महत्वाच्या घडामोडी

Powered by Blogger.