Halloween party ideas 2015


अखिल भारतीय सुवर्णकार समाजाच्या डॉक्टर सेलच्या जळगाव जिल्हाध्यक्षपदी डॉक्टर राजेंद्र पिंगळे यांची निवड.

अमळनेर प्रतिनिधी
अखिल भारतीय स्वर्णकार समाज विकास एवंम शोध संस्थान दिल्ली ,ह्या समाज विकास कार्य करणाऱ्या संस्थेच्या वैद्यकीय (डॉक्टर सेल) सेलच्या जळगांव जिल्ह्याध्यक्षपदी अमळनेर सुवर्णकार समाजाचे विश्वस्त व माजी उपनगराध्यक्ष डॉ राजेंद्र पिंगळें यांची नियुक्ती सदर राष्ट्रीय संस्थेचे राष्ट्रीय अध्यक्ष श्री एम के राजपूत दिल्ली यांनी नुकतीच नियुक्तीपत्र देऊन केली आहे. सदर नियुक्तीसाठी महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष श्री सुभाषराव शहाणे कार्याध्यक्ष श्री अनिलजी पोतदार व डॉक्टर सेलचे तीन राज्यांचे प्रभारी चेअरमन व सचिव डॉ भरत राव वाघ मालेगाव यांनी शिफारस केली होती ,डॉ राजेंद्र पिंगळें हे विविध सामाजिक संस्थेत व शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख म्हणूनही कार्यरत आहेत .लवकरचं ते आपली जिल्ह्याची व तालुक्यांची डॉक्टर सेलची कार्यकारिणी वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली नियुक्ती करणार असून ह्या सेलमार्फत विविध वैद्यकीय तपासणी शिबीर आयोजित करून समाजासाठी व ईतर घटकांसाठी कार्य करण्याचा मानस डॉ राजेंद्र पिंगळें यांनी व्यक्त केला आहे.त्यांच्या ह्या स्तुत्य निवडीचे अमळनेर अहिर सुवर्णकार समाज अध्यक्ष जितेंद्र भामरे, उपाध्यक्ष राजेंद्र पोतदार,सर्व विश्वस्त मंडळ,माजी अध्यक्ष रामदास निकुंभ,मदन अहिरराव,मुकुंद विसपुते, मधुकर दुसाने , डॉ रनाळकर ,शिवसेनेचे तालुकाप्रमुख विजय पाटील,नगरसेवक संजय पाटील,प्रताप शिंपी,नितीन निळे,राजू फापोरेकर, आदींनी ह्या स्तुत्य निवडीचे अभिनंदन केले आहेति

WhatsApp वर क्लिक करा बातमी मिळवा

लोकप्रिय बातम्या

महत्वाच्या घडामोडी

Powered by Blogger.