बोले तैसा चाले हे ब्रीदवाक्य मुख्यमंत्र्यांनी केले सिद्ध-सभापती उदय वाघ
अमळनेर प्रतिनिधी
मराठा समाजाला शिक्षण आणि सरकारी नोकऱ्यांमध्ये आरक्षण देणाऱ्या कायद्याला काल गुरुवारी मुंबई उच्च न्यायालयाकडून सशर्थ मंजुरी मिळाल्याने अमळनेरात भाजपा कार्यकर्त्यानी भाजपाचे माजी जिल्हाध्यक्ष तथा बाजार समितीचे सभापती उदय वाघ व माजी आ कृषिभूषण साहेबराव पाटील यांच्या नेतृत्वात फटाके फोडून जल्लोष साजरा केला.
विश्राम गृहाजवळील महाराणा प्रताप चौकात हा जल्लोष साजरा करण्यात आला.यावेळी माजी आ साहेबराव पाटील यांनी शासनाचे आभार मानले तर उदय वाघ आपल्या भावना व्यक्त करताना म्हणाले की भाजपा सरकारच्या सकारात्मक धोरणामुळे हा ऐतिहासिक निर्णय झाला असून याचे संपूर्ण श्रेय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आहे,अनेक वर्षांपासूनची ही मागणी प्रलंबित असताना मुख्यमंत्र्यांनी हा विषय गंभीर्याने घेऊन महसूल मंत्री ना. चंद्रकांत दादा पाटील यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली अखेर समितीच्या निर्देशानुसार 16 टक्के आरक्षणाचा ऐतिहासिक निर्णय राज्य शासनाने घेऊन मराठा समाजास सुखद धक्का दिला,मात्र मराठा आरक्षणाच्या विरोधात मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल झाल्याने अडचण निर्माण झाली असताना न्यायालयाने देखील या कायद्याला सशर्थ मंजुरी देऊन मराठा समाजास नोकरी आणि शिक्षणामध्ये 12 आणि 13 टक्के आरक्षण दिले आहे.मराठा समाजाचे मनोबल वाढविणारा हा निर्णय असून विशेष करून सामान्य कुटुंबातील मुलांना शिक्षण आणि नोकऱ्यांमध्ये लाभ होणार आहे.आजपर्यंत मुख्यमंत्री फडणवीस यांनी जे बोलले ते करून दाखविले असून आताही त्यांनी बोले तैसा चाले हे ब्रीदवाक्य खरे केले आहे,अमळनेर मतदार संघ आणि मराठा समाजाच्या वतीने आम्ही मुख्यमंत्र्यांचे विशेष आभार मानतो अशी भावना वाघ यांनी व्यक्त केली.यावेळी भाजपा शहराध्यक्ष शितल देशमुख,सरचिटणीस उमेश वाल्हे,सात्री सरपंच महेंद्र बोरसे , श्रीनिवास मोरे , जिजाबराव पाटील , महेंद्र महाजन , दिलीप ठाकूर , समाधान पाटील , सौरभ पाटील , नगरसेवक विवेक पाटील , माधुरी पाटील , उमेश वाल्हे , हिरालाल पाटील , प स माजी सभापती डॉ दीपक पाटील , शरद सोनवणे , श्याम आहिरे , नरेंद्र संदनशिव , दिनेश शिसोदे, सुधाकर पाटील , संजीव पाटील, दीपक पवार,चेतन जाधव ,महेश भामरे , राहुल चौधरी हजर होते.