अमळनेर प्रतिनिधी
सध्या अमळनेर शहरातील पाण्याचा प्रश्न गंभीर बनत असताना पाण्यासाठी लोकांना वणवण फिरत असताना सत्ताधारी काही बंडखोर नगरसेवकांनी आपल्या प्रभागातील लोकांच्या समस्या सुटावी यासाठी जळगाव जिल्हाधिकारी अविनाश ढाकणे यांची भेट घेऊन पाण्याचा प्रश्न सोडवा चक्क त्यांना साकडे घातले.
अमळनेर नगरपरिषदेच्या सत्ताधारी नगरसेवकांनी मा.जिल्हाधिकारी डॉ.अविनाश ढाकणे यांच्याकडे अमळनेर शहराच्या बिकट झालेल्या पिण्याच्या पाणी प्रश्नी तातडीची उपाय योजना करण्याची चर्चा करून निवेदन देतांना नगरसेवक प्रताप शिंपी, सुरेश पाटील, संतोष पाटील, संजय भिल, साखरलाल महाजन, रवि पाटील, राजेंद्र यादव, संजय (भूत बापू ) पाटील, महेश पाटील, संजय पवार इ. उपस्थित होते.