*सावित्रीबाई फुले ज्ञानदीप प्रतिष्ठान व आमदार आशुतोष काळे फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित सुप्रसिद्ध लेखक व कवी प्रवीण दवणे यांच्या जगण्याची कला या कार्यक्रमाच्या माध्यमातून जमा करण्यात आलेल्या वर्गणीतून दहावीच्या निवडक गरजू विद्यार्थ्यांना स्मार्टफोन चे वाटप*
कोपरगाव प्रतिनिधी
सावित्रीबाई फुले ज्ञानदीप प्रतिष्ठाण व आमदार मा.श्री. आशुतोषदादा काळे फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित सुप्रसिद्ध लेखक व कवी प्रवीण दवणे यांच्या जगण्याची कला या कार्यक्रमाच्या माध्यमातून जमा करण्यात आलेल्या निधीतून आज कोपरगाव तालुक्यातील १० वीच्या निवडक गरजू विद्यार्थ्यांना अहमदनगर जिल्हा सहकारी बँकेच्या संचालिका सौ. चैतालीताई काळे यांच्या हस्ते स्मार्टफोन वाटप करण्यात आले.*
यावेळी राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष काका कोयटे, ठोळे उद्योगसमूहाचे कैलास ठोळे, सौ. स्मिताताई जोशी, ज्ञानेश्वर वाकचौरे, सावित्रीबाई फुले ज्ञानदीप प्रतिष्ठाणच्या अध्यक्षा सौ. संगिताताई मालकर, सौ. वृंदाताई कोऱ्हाळकर, सौ. वर्षाताई आगरकर, सौ. सुनीताताई वाकचौरे, सौ. सुनीताताई ससाणे, सौ. छायाताई गिरमे, विद्यार्थी व पालक उपस्थित होते.