Halloween party ideas 2015

जळगांव प्रतिनिधी
आज दिनांक 21.10.2020 बुधवार रोजी जिल्हाधिकारी जळगाव जिल्हा यांच्या कार्यालयासमोर शाळा शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी संघटना महाराष्ट्र राज्य शी संलग्नित सर्व शिक्षकांनी मिळून एक दिवसीय धरणे आंदोलन केले. या आंदोलनात मोठ्या संख्येने शिक्षक उपस्थित होते पण कोणा संक्रमणाचा काळ असल्यामुळे मंडपात फक्त पाच लोकांना उपस्थित राहण्याची परवानगी देण्यात आलेली होती. त्यामुळे मंडपात कमीत कमी संख्या घेऊन हे आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात मनापासून सामील झालेल्या व सहकार्य करणाऱ्या सर्व शिक्षकांचे संघटनेच्यावतीने आम्ही खूप खूप आभारी आहोत. तसेच इतके करूनही काही शिक्षकांची उदासीनता आम्हाला दिसून आली. ते ते जिल्हा कार्यालयासमोर फळ कले सुद्धा नाहीत. असो.......
आजचा धरणे आंदोलनाची थोडक्यात माहिती आपणासमोर सादर करीत आहोत.

*प्रमुख मागण्या-*
1) अनुदानित शाळेतील नैसर्गिक वाढीव वर्ग तुकड्यांना प्रचलित नियमानुसार निधी सह घोषित करणे.
2) संचालक कार्यालय पुणे स्‍तरावर अघोषित नैसर्गिक वाडी वर्ग तुकड्यांना लवकरात लवकर तपासून मंत्रालयात पाठवणे.
3) उच्चमाध्यमिक वर्ग तुकड्यांना निधी सह घोषित करणे.

*आपल्या संघटनेच्या या आंदोलनास पाठींबा जाहीर करणाऱ्या संघटना-*
1) माननीय गौरव भोळे सर जिल्हाध्यक्ष खाजगी शिक्षक संघटना महाराष्ट्र राज्य
2) माननीय मराठे सर महाराष्ट्र राज्य शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी संघटना, परभणी.
3) माननीय श्री गोविंदा पाटील महाराष्ट्र राज्य शिक्षक सेना जळगाव जिल्हा कार्याध्यक्ष.

*निवेदन देण्यात आली-*
1) माननीय गुलाबराव जी पाटील (पालकमंत्री जळगाव जिल्हा)
2) माननीय आमदार सुरेश दामू भोळे ( जळगाव शहर)
3) लालचंद पाटील साहेब (जिल्हा उपाध्यक्ष जि.प. जळगाव) यांनी निवेदन स्वीकारून निवेदनातील मागण्या या माननीय मुख्यमंत्री साहेब, माननीय शिक्षण मंत्री व शिक्षण सचिव यांच्यापर्यंत मेलने पाठवण्याचे आश्वासन दिले.
तर माननीय शिक्षक आमदार डॉक्टर सुधीर तांबे यांच्याशी फोनवर आपला विषय सविस्तर मांडण्यात आला. यावेळी माननीय डॉक्टर तांबे साहेब हे माननीय शिक्षण मंत्री वर्षाताई गायकवाड यांच्या जवळ मुंबई येथे बसलेले होते. त्यांनी आपला विषय सकारात्मकपणे माननीय शिक्षण मंत्री वर्षाताई गायकवाड यांच्यासमोर मांडण्याचे आश्वासन दिले.

तसेच आजच्या आपल्या धरणे आंदोलनाची दखल जवळ जवळ सर्व वर्तमानपत्रांनी घेतली व त्यांनी त्यांचे प्रतिनिधी पाठवून आपले निवेदन स्वीकारले.

*या धरणे आंदोलन उपस्थित*
*किशोर घुले सर* (राज्य प्रसिद्धीप्रमुख)

*शेख रोशन सर* (नाशिक विभाग प्रमुख)

*जितेंद्र पाटील सर* (जळगाव जिल्हा प्रमुख)
गौरव भोळे सर
काशिफ शेख सर
सय्यद मंजूर सर
जुबेर खान सर
दीपक धनगर सर
नितीन पाटील सर
शेख मोहसीन सर
छाया पाटील मॅडम
रूपाली काळे मॅडम
हेमलता बोरवले मॅडम
आधी शिक्षक बंधू आणि भगिनी या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित होते.





WhatsApp वर क्लिक करा बातमी मिळवा

लोकप्रिय बातम्या

महत्वाच्या घडामोडी

Powered by Blogger.