*निमगुळच्या बलिकेवर अत्याचार प्रकरणी
गुन्हेगाराला पकडून कठोर शिक्षा दया
ओबीसी असोसिएशनची मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांच्याकडे मागणी
अमळनेर प्रतिनिधी
निमगूळ जि. धुळे येथे रविवार रोजी दोन वर्षीय बलिकेवर झालेला अत्याचार व जीवे ठार मारल्या प्रकरणी माळी बांधवांच्या भावना दुखावल्या असून याप्रकरणात असलेल्या खरे गुन्हेगारांचा त्वरीत शोध घेवून कडक कारवाई करावी , अशी मागणी संत सावता माळी संघटने कडून करण्यात आली आहे. या घटनेचे तीव्र शब्दात निषेध व्यक्त करत याबाबत निवेदन तहसिल कार्यालय व पोलीस स्टेशन धरणगाव यांना देण्यात आले.
निमगूळ ता.जि. धुळे येथील अतिशय गरीब असलेले प्रवीण रामराव माळी शनिवारी रात्री कुटुंबासह झोपले होते. अज्ञात व्यक्तीने माळी कुटुंबीयांजवळ झोपलेल्या २ वर्षीय बालिकेला उचलून गावापासून दोन कि.मी.अंतरावरील विहिरीत फेकून निर्घृण खून केल्याची घटना उघडकीस आली आहे. बालिकेवर अत्याचार करून विहिरीत फेकण्यात आले, पूर्व वैमनस्यातून खून झाला की नरबळी..? असा प्रश्न आहे.
महाराष्ट्र पत्रकार संघ, ओबीसी शिक्षक असोसिएशन, अ.भा.माळी महासंघाचे पदाधिकारी या घटनेचा निषेध व्यक्त करीत आहेत.
माळी कुटुंबातील बालिका कु. प्राची व तिचे वडील प्रवीण माळी कुटुंबासह झोपले होते. रात्री साडे बारा वाजता प्रवीण माळी उठले असता त्यांना अंथरुणावर त्यांची दोन वर्षीय बालिका दिसली नाही .
सभोवतालच्या रहिवाश्यांनाही विचारले, त्याबाबत कोणीही सांगू शकले नाही. सर्वत्र शोध घेतले असता गावाजवळील दोन किमी अंतरावरील विहिरीत बालिकेच्या मृतदेह तरंगताना दिसून आला
याला नेमकं जबाबदार कोण? या घटनेची सखोल चौकशी करून दोषींना तात्काळ फाशी देण्यात यावी. अशी मागणी ओबीसी शिक्षक असोसिएशनचे राज्याध्यक्ष विलासराव पाटील ,जिल्हाध्यक्ष ईश्वर महाजन, जिल्हामहिलाध्यक्षा वसुंधरा लांडगे, जिल्हा कार्यकारणी सदस्य प्रभाकर विंचूरकर, एन.आर.चौधरी, संघटक मनोहर पाटील, तालुकाध्यक्ष सोपान भवरे,शहराध्यक्ष डि.ए.सोनवणे, सल्लागार दशरथ लांडगे, गं.का.सोनवणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे मेलद्वारे मागणी केली आहे.