मुंबई प्रतिनिधी
कोरोना काळात जगभरात आणि देशात उद्योग सहकार राजकारण सर्वच क्षेत्रात आव्हाने निर्माण झाली असून शिक्षण क्षेत्राला देखील मोठ्या आव्हानांना सामोरे जावे लागत आहे. यंदाचे शैक्षणिक वर्ष शाळा बंद पण शिक्षण सुरू अशा परिस्थितीत केंद्र आणि राज्य सरकारांच्या द्वारेऑनलाइन पद्धतीने सुरू झाल.ऑनलाइन शिक्षण ग्रामीण भागात पोहोचण्यात बऱ्याच ठिकाणी अडथळे निर्माण होत असल्याचे राज्यभर चित्र आहे. या पार्श्वभूमीवर जळगाव जिल्ह्यातील आदिवासी वाडी वस्तीवर एकच गाला पूर ग्रुप ग्रामपंचायत अंतर्गत शिक्षक म्हणून कार्य करणारे जिल्हा परिषद शाळेचे शिक्षक दाम्पत्य किशोर पाटील कुंझरकर (जिल्हा परिषद प्राथमिक शाळा भिल्लवस्ती गालापूर तालुका एरंडोल) जयश्री पुरुषोत्तम पाटील (जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा गालापुर तालुका एरंडोल) यांनी एकत्रित येत कोरोना काळात ऑनलाइन शिक्षणातील अडचणी दूर होण्यासाठी स्वेच्छेने सुरू केलेला घर घर शाळा शिक्षण आपल्या दारी हा प्रत्यक्ष विद्यार्थ्यांच्या अंगणात जाऊन पालक शाळा व्यवस्थापन समितीच्या सहकार्याने शिक्षणाचे धडे देण्यासाठी सुरू केलेला अनोखा उपक्रम राज्यात सर्वत्र शिक्षण सुरू ठेवण्यासाठी शिक्षक केंद्र आणि राज्य शासनाच्या सोबत या काळात काम करत असल्याचा संदेश देणारा व सर्वत्र अनुकरणीय ठरणारा उपक्रम म्हणून पुढे आला आहे .जळगाव जिल्ह्यातील या उपक्रमाची नोंद यापूर्वी विविध दैनिके,सर्वपक्षीय लोकप्रतिनिधींनी जिल्हा परिषद पंचायत समिती एस सी ईआर टी त्या जोडीने टीव्ही नाईन चैनल आदींनी घेतले असून आज जय महाराष्ट्र चैनल वर संध्याकाळी आठ वाजता जळगाव जिल्ह्यातील शिक्षण क्षेत्रात सकारात्मकतेने कार्य करणाऱ्या या शिक्षक दांपत्याची ऑनलाइन मुलाखत प्रसारित करण्यात येत आहे. स्वतःच्या दोन्ही मुलांना जिल्हा परिषदेच्या शाळेत दाखल करणे, राज्य शासनाच्या शिक्षकांना इंग्रजी विषयाच्या धडे देणाऱ्या तेजस प्रकल्पात टॅग कॉर्डिनेटर म्हणून भूमिका बजावने, समता विभागाअंतर्गत बा ल रक्षक म्हणून कार्य करणे, राज्यातील शिक्षकांना सतत चांगल्या कार्यासाठी प्रेरणा देणे, साप्ताहिक शिक्षक ध्येय, रयतेचा वाली सारख्या डिजिटल साप्ताहिकातून लिखाण करणे, जीवन शिक्षण व इतर दैनिकात सतत सकारात्मक लिखाण करून सर्वांना प्रेरणा देणे, कृती संशोधन, राज्यात सर्वप्रथम शैक्षणिक जिल्हा परिषद शाळांची पटसंख्या टिकावी यासाठी जिल्हा परिषद शाळांमध्ये सेमी इंग्रजी माध्यमाची सुरुवात करणे, विविध प्रशिक्षणात तज्ञ मार्गदर्शकाची भूमिका बजावणाऱ्या या शिक्षक दाम्पत्याने को रोना काळात कोरोना फायटर बनत केंद्र व राज्य शासनाच्या शिक्षण सुरू ठेवण्याच्या प्रयत्नांना सर्वांच्या सहकार्याने व मार्गदर्शनाने बळकटी देण्याचे कार्य केल्याने त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे. किशोर पाटील कुंझरकर हे सामाजिक,शैक्षणिक कार्यात अग्रेसर व्यक्तिमत्त्व असून राज्यातील शिक्षक संघटनांच्या राज्य समन्वय समितीचे राज्य महासचिव तसेच राज्य शासन व जिल्हा परिषद आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त शिक्षक आहे त. जयश्री पाटील या उपक्रमशील प्रयोगशील तंत्रस्नेहीआदर्श शिक्षिका असून शासनाच्या तेजस प्रकल्प कॉर्डिनेटर तसेच मुक ऑनलाइन प्रकल्पाच्या एरंडोल तालुका कॉर्डिनेटर आहेत. त्यांच्या सातत्यपूर्ण शैक्षणिक सकारात्मक कार्यसाठी सर्वत्र अभिनंदन होत असून शिक्षण क्षेत्रातील नावीन्याचा ध्यास घेणारे उपक्रमशील शिक्षक दाम्पत्य म्हणून ते सर्वत्र सुपरिचित आहे त.