*भाजपा मधील खडसे समर्थक माळी समाजातील कुशल संघटन असलेल्या मोठया नेत्याने दिला पक्षाचा राजीनामा.*
माळी समाजाचे ओबीसी नेते श्री.अनिल महाजन यांचा भाजपा ओबीसी मोर्चा प्रदेश पदाधिकारी पदाचा राजीनामा.
महाराष्ट्र माळी समाज महासंघाचे प्रदेशाध्यक्ष व ओबीसी जनक्रांती परिषदेचे संस्थापक अध्यक्ष ओबीसी-बहुजन नेते श्री.अनिल महाजन यांनी भारतीय जनता पार्टी या पक्षातून ओबीसी मोर्चा प्रदेश कार्यकारणी सदस्य व प्राथमिक सदस्यांचा राजीनामा दिला आहे.
मी माझ्या वैयक्तिक कारणास्तव राजीनामा देत आहे. तरी पक्ष नेतृत्वाने त्वरित राजीनामा स्वीकारवा ही नम्र विनंती असे पत्रकात लिहिले आहे. श्री.अनिल महाजन हे खडसे समर्थक आहेत.माजी महसूल मंत्री ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांचे अतिशय निकट वर्तीय महाजन हे मानले जाणारे आहेत. अनिल महाजन यांनीसुद्धा भाजपाला आज सोडचिट्टी दिली आहे.श्री.अनिल महाजन यांनी माळी समाजाचे ओबीसी समाजाचे एक कुशल संघटन राज्यात उभे केले आहे.राज्यभर एक वेगळी ओळख महाजन यांनी निर्माण केली आहे.ओबीसीचे अनेक कार्यकर्ते लवकरच भाजपा पक्षाला सोडचिठ्ठी देतील अशी सुत्रांची माहिती आहे.