Halloween party ideas 2015

*खळेश्वर महादेव परिसरातील हिंदू स्मशानभूमी झाली दारुडे व चोरट्यांचा अड्डा*

अमळनेर प्रतिनिधी

अमळनेर येथील बहादरपूर रोडवरील खळेश्वर मंदिरासमोरील हिंदू स्मशानभूमी महाराष्ट्र शासनाच्या विकास योजनेअंतर्गत माजी आमदार दादासो शिरिष चौधरी यांच्या प्रयत्नातून स्मशानभूमी (वैकुंठधाम) निर्माण झाले असून झालेले बांधकाम अमळनेर नगर परिषदेकडे हस्तांतरित करण्यात आले आहे सदर स्मशानभूमी ही दारुडे व चोरटयांचा सध्या स्थिती अड्डा झालेला आहे. चोरट्यांनी ह्या ठिकाणी असलेल्या दशक्रिया विधी हॉलच्या नळाच्या तोट्या तोडून चोरून नेलेल्या आहेत तसेच वस्तू शोधण्यासाठी अंत्यसंस्कार केलेल्या प्रेताची अास्तीही इकडे तिकडे फेकून धार्मिक भावना दुखावण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे तसेच स्मशानाच्या बैठक शेड, दहन ओटे या ठिकाणी प्रचंड प्रमाणात घाण झालेले असून सदर स्मशान बेवारस असल्यासारखी स्थिती निर्माण झाली आहे खळेश्वर स्मशान भूमी वैकुंठधाम च्या देखरेखीसाठी नगरपरिषदेने कायमस्वरूपी माणसाची नियुक्ती करावी व नगर परिषदेकडून अंत्यसंस्कारासाठी मिळणारे सरपंन (लाकूड)चा डेपो त्याठिकाणी निर्माण करावा व चोरट्यांनी चोरून नेलेल्या नळाच्या तोट्या बसविण्यात येऊन परिसरात वृक्षारोपण करून स्मशानभूमी संरक्षण कुंपण व्हावी अशी मागणी संत सावता सेवामंडळ, क्षत्रीय माळी समाज पंचमंडळ ,अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद, महाराष्ट्र माळी समाज महासंघ व परिसरातील प्रभाग क्रमांक 15,16,17 यामधील नागरिकांकडून करण्यात येत आहे अशा आशयाचे निवेदन आज नगर परिषदेचे मुख्याधिकारी यांच्यावतीने गायकवाड साहेब यांना देण्यात आले. यावेळी क्षत्रिय काच माळी समाजाचे अध्यक्ष गंगाराम निंबा महाजन, संत सावतामाळी मित्र मंडळ अध्यक्ष आबा सुकदेव महाजन, अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे शहराध्यक्ष प्रताप पाटील, महाराष्ट्र माळी समाज महासंघाचे जिल्हा कार्याध्यक्ष भीमराव महाजन ,माजी उपनगराध्यक्ष पांडुरंग नामदेव महाजन ,नगरसेवक देविदास भगवान महाजन, मंडळाचे सदस्य मनोहर भगवान महाजन सर, नगरपालिकेचे विरोधी पक्ष गटनेते बबली भाऊ पाठक ,समाजसेवक साखरलाल महाजन सर आदी उपस्थित होते
फोटो


WhatsApp वर क्लिक करा बातमी मिळवा

लोकप्रिय बातम्या

महत्वाच्या घडामोडी

Powered by Blogger.